T20 WC 2022: रशीद खान दुखापतग्रस्त असूनही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला, मुख्य प्रशिक्षक म्हणाले…

| Updated on: Nov 05, 2022 | 1:37 PM

श्रीलंकेविरुद्ध मॅच सुरु असताना रशीद खान जखमी झाला होता.

T20 WC 2022: रशीद खान दुखापतग्रस्त असूनही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला, मुख्य प्रशिक्षक म्हणाले...
rashid khan
Image Credit source: twitter
Follow us on

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात (Australia) सद्या सुरु असलेली T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) सेमीफायनलपर्यंत आली आहे. काल ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये रोमांचक सामना झाला. शेवटच्या बॉलपर्यंत दोन्ही टीममधील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळाला. कालच्या सामन्यात रशीद खान (Rashid Khan) दुखापतग्रस्त असताना सुध्दा क्रिकेट खेळला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना रशीद खानने घाम फोडला होता.

श्रीलंकेविरुद्ध मॅच सुरु असताना रशीद खान जखमी झाला होता. परंतु कालची मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाची असल्याने तो खेळला. कालच्या सामन्यात त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा केली.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये रशिद खानने चांगली गोलंदाजी केली. तसेच आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. जखमी असताना सुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध रशिद खानने खेळण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा अॅटीट्यूड प्रशिक्षकांना अधिक आवडला. काल अफगाणिस्तान टीमला गरज धावांची गरज असताना रशिद खानने 23 चेंडूत 48 धावा केल्या.