मुंबई: ऑस्ट्रेलियात (Australia) झालेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाचा सेमीफायनलच्या मॅचमध्ये पराभव झाला. तेव्हा टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून टीका करण्यात आली होती. न्यूझिलंडविरुद्ध टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे. वरिष्ठ खेळाडूंशिवाय टीम इंडिया न्यूझिलंड दौऱ्यावर पाठवण्यात आली आहे. त्यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष आहे. कारण टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयकडे खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना काढून टाकण्याची विनंती केली होती.
टीम इंडिया मागच्या काही दिवसांपासून खराब कामगिरी करीत आहे. त्यामुळे टीम इंडिया कर्णधार बदलावा अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी केली होती. एकदिवसीय मॅचसाठी टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवन याला कर्णधारपद देण्यात आलं होतं. तर t20 मालिकेसाठी हार्दीक पांड्याला कर्णधार पद देण्यात आलं आहे.
“क्रिकेटच्या तीन फॉरमॅटमध्ये एकचं कर्णधार असणे सोप्पे नाही. हार्दीक पांड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून कर्णधारपदाच्या काळात सुद्धा चांगली खेळी होईल अशी अपेक्षा आहे. रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि कसोटी सामन्याचं कर्णधार पद आहे, त्यामुळे आता चांगली कामगिरी होईल असं शास्त्रींनी सांगितलं.
टीम इंडियाची उद्या न्यूझिलंडविरुद्ध पहिली मॅच होणार आहे. त्या मॅचमध्ये ओपनिंग जोडी कोण असणार हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच टीमचे प्रशिक्षक लक्ष्मण यांनी टीमला एक गुरुमंत्र दिला आहे.