येत्या रविवारी ऑस्ट्रेलियात (Australia) टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेला सुरुवात होत आहे. सोशल मीडियावर (Social Media) आत्तापासून चाहत्यांनी चर्चा करायला सुरुवात केली आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये यावर्षी सोळा टीम सहभागी झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियात सोळा टीम गेल्यापासून तिथं जोरदार प्रॅक्टीस करीत आहेत.
टीम इंडियाची फलंदाजी एकदम जोरात आहे. सध्या सुर्यकुमार यादव, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्याकडे कोणत्याही क्षणी एकहाती मॅच जिंकण्याची ताकद आहे असं रवी शास्त्री यांनी एका आयसीसीच्या वेबसाईटला मुलाखत देताना सांगितले आहे.
टीम इंडियाला आपलं क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. कारण टीम इंडियाची फिल्डींग खराब होत आहे. त्यामुळे टीम इंडियाला प्रत्येक सामन्यात 20 ते 30 धावा अधिक काढाव्या लागत आहेत.
टीम इंडियाच्या सगळ्या बाजू एकदम भक्कम आहेत. फक्त टीम इंडियाने फिल्डींगमध्ये सुधारणा केली, तर टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकते असं विधान केलं आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.