Ravi Shastri : मोहम्मद शम्मीला आशिया चषकातून डावलल्याने रवी शास्त्री भडकले

| Updated on: Sep 07, 2022 | 3:21 PM

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून टीम इंडीचा पराभव झाल्यानंतर टीममध्ये असलेल्या गोलंदाजांवरती जोरदार टीका होत आहे. मागच्या दोन्ही सामन्यात गोलंदाजांची कामगिरी अधिक खालावली आहे.

Ravi Shastri : मोहम्मद शम्मीला आशिया चषकातून डावलल्याने रवी शास्त्री भडकले
माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री
Image Credit source: social
Follow us on

काल श्रीलंकेच्या (Shrilanka) खेळाडूंनी उत्तम दर्जाचा खेळ केल्यामुळे टीम इंडिया (Team India) पराभूत झाली. भारताच्या माजी खेळाडूंनी टीम इंडियावरती आणि टीम व्यवस्थापनावरती अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने व्यवस्थापनाला तीन प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सुद्धा चांगलेचं फटकारले आहे. जसप्रीम बुमराह जर आजारी आहे, तर त्यांच्या जागी मोहम्मद शम्मीला का खेळवलं नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मोहम्मद शम्मी सद्या पुर्णपणे तंदुरुस्त आहे, तसेच तो सद्या त्याच्या घरी आहे. त्यामुळे त्याला खेळवायला हवे होते असा प्रश्न टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला केला आहे. त्याचबरोबर त्यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यामुळं डोकं गरगरत असल्याचं म्हटलं आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून टीम इंडीचा पराभव झाल्यानंतर टीममध्ये असलेल्या गोलंदाजांवरती जोरदार टीका होत आहे. मागच्या दोन्ही सामन्यात गोलंदाजांची कामगिरी अधिक खालावली आहे.

हे सुद्धा वाचा

मोहम्मद शम्मीने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्याचबरोबर तो चांगल्या फॉर्ममध्ये देखील दिसत तरी सुद्धा त्याला डावलण्यात आलं. त्यामुळे सोशल मीडियावर व्यवस्थापनावरती क्रिकेट चाहते टीका करीत आहेत.