अहमदाबाद : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 3rd Test) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (Ravichandran Ashwin) किर्तीमान केला आहे. अश्विनने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेण्याची अफलातून कामगिरी केली आहे. (Ravichandran Ashwin became the second fastest bowler in Test cricket to take 400 wickets)
Special bowler
Special milestone
Special emotionsTake a bow, @ashwinravi99! ??@Paytm #INDvENG #TeamIndia #PinkBallTest
Follow the match ? https://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/HkxrEiTFpo
— BCCI (@BCCI) February 25, 2021
अश्विनने इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला आऊट करत 400 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 400 विकेट्स घेणारा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. अश्विनने ही कामगिरी 77 व्या कसोटी सामन्यात केली आहे. कसोटीमध्ये वेगवान 400 विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीथरनच्या नावे आहे. मुरलीने एकूण 72 टेस्ट मॅचमध्ये ही कामगिरी केली होती.
What a champion bowler ??
4️⃣0️⃣0️⃣ Test wickets for @ashwinravi99 and we're sure there's still many more to come ???
Fastest Indian to achieve this milestone ???@Paytm #INDvENG #TeamIndia #PinkBallTest
Follow the match ? https://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/QyvRUr9e4Y
— BCCI (@BCCI) February 25, 2021
तसेच अश्विन टीम इंडियाकडून 400 बळींचा टप्पा ओलांडणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. टीम इंडियाकडून आतापर्यंत अनिल कुंबळे, कपिल देव हरभजन सिंह आणि आता अश्विने ही कामगिरी केली आहे.
A major milestone for India’s spin king R Ashwin ?#INDvENG pic.twitter.com/QbXdiD8fYO
— ICC (@ICC) February 25, 2021
अश्विनने या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला आऊट केलं. यासह अश्विनने स्टोक्सची कसोटी क्रिकेटमध्ये 11 व्यांदा शिकार केली.
Ashwin gets Stokes, AGAIN! ??
He's dismissed Stokes 11 times so far in Tests – what a stat to have for @ashwinravi99! ??
England lose their 4⃣th wicket in the second innings. @Paytm #INDvENG #TeamIndia #PinkBallTest
Follow the match ? https://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/bbv0IR72lL
— BCCI (@BCCI) February 25, 2021
अश्विनने बेन स्टोक्सला बाद करून 600 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. कसोटीत 400 विकेट घेण्याव्यतिरिक्त अश्विनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 150 आणि टी -20 क्रिकेटमध्ये मध्ये 52 बळी घेतले आहेत. या यादीत अश्विनच्या पुढे अनिल कुंबळे, कपिल देव, हरभजन सिंह, झहीर खान यांची नावे आहेत. भारताचा माजी कर्णधार कुंबळे याच्या नावार 956 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. हरभजनने 711 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. हरभजननंतर विश्वचषक विजेता कप्तान कपिल देवचा नंबर लागतो. कपिल देवच्या नावावर 687 विकेट्स आहेत. तर या यादीत झहीर खान चौथ्या स्थानी आहे. झहीर खानने 610 आंतरराष्ट्रीय बळी मिळवले आहेत.
संबंधित बातम्या :
(Ravichandran Ashwin became the second fastest bowler in Test cricket to take 400 wickets)