“कंप्युटरसमोर बसून फुकरे लोक…”, नागपूर कसोटीनंतर रविंद्र जडेजा कोणावर भडकला?

| Updated on: Feb 16, 2023 | 4:44 PM

नागपूर कसोटीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रविंद्र जडेजाने आपला राग व्यक्त केला आहे. वारंवार टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. आतापर्यंत इथे कसे पोहोचलो आहे, याची कल्पना नसल्याने ते टीका करत असल्याचं त्याने सांगितलं.

कंप्युटरसमोर बसून फुकरे लोक..., नागपूर कसोटीनंतर रविंद्र जडेजा कोणावर भडकला?
पडत्या काळात तसं वागणाऱ्यांना रविंद्र जडेजानं सुनावलं, नागपूर कसोटीनंतर काढली भडास
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतानं 1-0 ने आघाडी घेतली आहे. नागपूरमधील पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने मोलाची भूमिका बजावली. तसेच पहिल्याच सामन्यातून जोरदार कमबॅक करत विरोधकांची तोंडं बंद केली आहेत . पहिल्या डावात अर्धशतक आणि पाच गडीही बाद केले होते. तर दुसऱ्या डावात दोन गडी बाद करत विजयात भर घातली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.असं असलं तरी गेल्या काही महिन्यापासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे रविंद्र जडेजा क्रिकेटपासून दूर होता. शेवटचं सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये खेळला होता. त्यानंतर झालेल्या टी 20 वर्ल्डकप, न्यूझीलँड आणि बांगलादेश दौऱ्याला मुकला होता. तसेच भारतात खेळल्या गेलेल्या न्यूझीलँड, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही खेळला नव्हता. टी 20 वर्ल्डकपमध्ये रविंद्र जडेजाची उणीव दिसून आली होती. भारताला उपांत्य फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला होता.

काय सांगितलं रविंद्र जडेजानं?

2013 साली ट्विटरवरील एका पोस्टमुळे रविंद्र जडेजा चर्चेत आला होता. तेव्हा त्याने ट्रोलर्संना उत्तर देताना लिहिलं होतं की, “मला परखण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका. मी कोणत्या प्रसंगातून जात आहे याची तुम्हाला तीळमात्र कल्पना नाही.” त्या ट्वीटवर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना जडेजानं सांगितलं की, “तेव्हा माझ्याकडून चांगला खेळ होत नव्हता.त्यामुळे ट्रोलर्सने मला निशाण्यावर घेतलं होतं. तसेच नको नको ती नावं ठेवली होती. ते मला मेहनत न करता इथपर्यंत पोहोचल्याचं सांगत होते. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी किती मेहनत केलीय याबाबत कल्पना नाही.”

“कंप्युटरसमोर बसून मीम्स बनवतात आणि काहीही लिहितात. तसेच आयपीएलमधून पैसे कमवतात अशी टीका करतात. पण त्यांना माहिती नाही इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत केली आहे. खरं तर त्यांच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही. आयपीएलमध्ये आमचा चेहरा बघून कोणी निवडत नाही.”, असं उत्तर रविंद्र जडेजानं ट्रोलर्सला दिलं.

आईच्या मृत्यूमुळे मानसिक धक्का बसला होता

2005 साली रविंद्र जडेजा 16 वर्षांच्या असताना आईचा दुर्देवी मृत्यू झाला होता. किचनमध्ये आग लागल्याने आईला गमावलं होतं. त्यावेळेस रविंद्र जडेजा घरी नव्हता. क्रिकेट खेळून जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याने खेळणं सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आईनं इथपर्यंत पोहोचवण्यासाठी किती मेहनत घेतली याची त्याला आठवण आली. त्यानंतर त्याने पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रीत केलं.

दुसरीकडे, रविंद्र जडेजाला सर हे अजिबात आवडत नाही. लोकांनी मला नावाने बोलवलं पाहीजे. जर बोलवायचं असेल तर बापू बोलू शकतात, कारण बापू बोलवणं मला आवडेल.