रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या दुखातपीमुळे टीमच्या बाहेर आहे. त्याच्या गुडघ्यावरती सर्जरी झाल्यापासून तो घरीच आहे. मागच्या दोन दिवसापुर्वी त्याने एक व्हिडीओ त्याच्या इंन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरती (Instagram Account) शेअर केला होता. त्यावेळी तो चालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हिडीओत दिसत होते. सद्या त्याची कमतरता टीममध्ये (Team India) दिसत असल्याचे चाहते सोशल मीडियावर म्हणत आहेत.
Still i have played twice the number of matches you have played and i m still playing. Learn to respect ppl who have achieved.i have heard enough of your verbal diarrhoea.@sanjaymanjrekar
हे सुद्धा वाचा— Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 3, 2019
रवींद्र जडेजा मैदानात जितका आक्रमक आहे. तितकाचं तो सोशल मीडियावर सुद्धा आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं. संजय मांजरेकर आणि जडेजाचं भांडण जगजाहीर आहे. कारण दोघांनी सोशल मीडियावर एकामेकांचे वाभाडे सुद्धा काढले होते. त्यामुळे चाहत्यांचे त्या दोघांवर अधिक लक्ष असतं.
Watching my dear friend on screen @sanjaymanjrekar pic.twitter.com/gU9CnxC9Mx
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) September 29, 2022
“बीट्स अँड पीस” असं मांजरेकरने जडेजाचं वर्णन केलं होतं. त्यावेळी जडेजाने मी तुझ्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि खेळत आहे. इतरांचा आदर करायला शिका तसेच तुमचा मुर्खपणा मी खूप ऐकला असल्याचे जडेजाने ट्विटच्या माध्यामातून म्हणटले होते.
आशिया चषक सुरु असताना मांजरेकरांनी रविंद्र जडेजाची एक मुलाखत घेतली होती. त्यावेळी मांजरेकरांनी माझ्याशी बोलायला काय हरकत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर दोघंही हसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
लिजेंड्स लीग क्रिकेटची मांजरेकर सध्या कॉमेंट्री करीत आहे, त्याचा एक फोटो रविंद्रजाने शेअर केला आहे. त्यावर मित्राला मी पाहत आहे असं लिहिलं आहे. त्यामुळे रविंद्र जडेजाचं ते ट्विट अधिक व्हायरल झालं आहे.