CSK vs RCB, IPL 2021 Match 19 Result | रवींद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी, धोनीच्या किंग्सने विराटसेनेचा विजयी रथ रोखला, बंगळुरुवर 69 धावांनी शानदार विजय

| Updated on: Apr 25, 2021 | 7:34 PM

Rcb vs Csk live Score Ipl 2021 | चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आमनेसामने

CSK vs RCB, IPL 2021 Match 19 Result | रवींद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी, धोनीच्या किंग्सने विराटसेनेचा विजयी रथ रोखला, बंगळुरुवर 69 धावांनी शानदार विजय
RCB vs CSK
Follow us on

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने (ChennaiSuperKings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (RoyalChallengersBanglore) 69 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. चेन्नईने बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांसमोर बंगळुरुला 9 विकेट्स गमावून 122 धावाच करता आल्या. बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक 34 धावा केल्या. तर चेन्नईकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (Rcb vs Csk live Score Ipl 2021 Match Royal Challengers Banglore vs Chennai Super kings Scorecard online Wankede Stadium Mumbai In Marathi)

 

Key Events

रवींद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी

रवींद्र जाडेजाने या सामन्यात बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग या तिनही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली. जाडेजाने 28 चेंडूत 5 सिक्स आणि 4 चौकारांसह नाबाद 62 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे जाडेजाने सामन्यातील 20 व्या ओव्हरमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरसह शानदार 36 धावा चोपल्या. तसेच बोलिंग करताना 3 विकेट्सही घेतल्या. तसेच डॅनियल ख्रिस्टियनला रनआऊट केलं.

चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी

बंगळुरुला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्सने पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईने या मोसमात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. त्यापैकी चेन्नईने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 25 Apr 2021 07:26 PM (IST)

    चेन्नईने बंगळुरुचा विजयी रथ रोखला

    चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्सचा विजयी रथ रोखला आहे. चेन्नईने बंगळुरुवर  69 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. चेन्नईने बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांसमोर बंगळुरुला 9 विकेट्स गमावून 122 धावाच करता आल्या.

  • 25 Apr 2021 07:18 PM (IST)

    चेन्नईचा बंगळुरुवर 69 धावांनी शानदार विजय

    बंगळुरुवर 69 धावांनी शानदार विजय, बंगळुरुचे 20 षटकात 9 बाद 122 धावा


  • 25 Apr 2021 06:59 PM (IST)

    बंगळुरुला नऊवा धक्का, जेमेनसन आऊट

    बंगळुरुला नऊवा धक्का, जेमेनसन आऊट, त्याने 13 चेंडूत 16 धावा केल्या, यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. तो बाद झाल्यानंतर बंगळुरुची अवस्था ही 103 धावांवर 9 बाद अशी आहे

  • 25 Apr 2021 06:47 PM (IST)

    बंगळुरुला आठवा धक्का, नवदिप सैनी आऊट

    बंगळुरुला आठवा धक्का, नवदिप सैनी आऊट, अवघ्या चौदा षटकात बंगळुरुचे गडी माघारी

  • 25 Apr 2021 06:34 PM (IST)

    बंगळुरुला मोठा धक्का

    बंगळुरुला मोठा धक्का बसला आहे. एबी डी व्हीलियर्स आऊट झाला आहे. एबीने 4 धावा केल्या.

  • 25 Apr 2021 06:33 PM (IST)

    बंगळुरुला पाचवा धक्का

    बंगळुरुने पाचवी विकेट गमावली आहे. डॅनियल ख्रिस्टियन आऊट झाला आहे.

  • 25 Apr 2021 06:32 PM (IST)

    बंगळुरुला चौथा झटका

    बंगळुरुने चौथी विकेट गमावली आहे. ग्लेन मॅक्सवेल आऊट झाला आहे. मॅक्सवेलने 22 धावा केल्या.

  • 25 Apr 2021 06:30 PM (IST)

    बंगळुरुला तिसरा धक्का

    बंगळुरुला तिसरा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर आऊट झाला. सुंदरने  7 धावा केल्या.

  • 25 Apr 2021 06:07 PM (IST)

    बंगळुरुला दुसरा धक्का

    शार्दुल ठाकूरने बंगळुरुला दुसरा धक्का दिला आहे. सलामीवीर देवदत्त पडीक्कल 34 धावांवर आऊट झाला आहे.

  • 25 Apr 2021 05:59 PM (IST)

    बंगळुरुला मोठा धक्का

    शानदार सुरुवातीनंतर बंगळुरुला मोठा धक्का बसला आहे.  कर्णधार विराट कोहली आऊट झाला आहे. विराटने 8 धावा केल्या.

  • 25 Apr 2021 05:48 PM (IST)

    देवदत्त पडीक्कलचा सिक्स

    देवदत्त पडीक्कलने सामन्यातील दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर 69 मीटर लांबीचा सिक्स लगावला आहे.

  • 25 Apr 2021 05:42 PM (IST)

    बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 192 धावांचे आव्हान

    बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल मैदानात खेळत आहेत. बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे आव्हान आहे.

  • 25 Apr 2021 05:33 PM (IST)

    20 व्या ओव्हरमध्ये 37 धावा

    रवींद्र जाडेजाने 20 व्या ओव्हरमध्ये 37 धावा फटकावल्या आहेत. यासह चेन्नईने बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे तगडे आव्हान दिले आहे. जाडेजाने 20 व्या ओव्हरमध्ये हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर एकूण 5 सिक्स, 1 चौकार, 1 दुहेरी धाव आणि नो बोल अशा 37 धावा केल्या. जाडेजाने सलग 4 चौकार लगावले. या चौथ्या षटकारासह  जाडेजाने अर्धशतक पूर्ण केलं.

  • 25 Apr 2021 05:24 PM (IST)

    जाडेजाचे सलग 4 सिक्स, अर्धशतक पूर्ण

    रवींद्र जाडेजाने 20 व्या ओव्हरमध्ये सलग 4 चौकार लगावले आहेत. यासह जाडेजाने शानदार अर्धशतक झळकावलं आहे.

  • 25 Apr 2021 05:11 PM (IST)

    चेन्नईला चौथा झटका

    चेन्नईला चौथा झटका बसला आहे. अंबाती रायुडू आऊट झाला आहे. रायुडूने 14 धावा केल्या.

  • 25 Apr 2021 05:03 PM (IST)

    RCB कडून रवींद्र जाडेजाला जीवनदान

    बंगळुरुने रवींद्र जाडेजाला जीवनदान दिलं आहे.  वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर जाडेजाने स्वीप फटका मारला. मात्र डीप मीडविकेटलवर असलेल्या  डेनियल ख्रिश्चियनने सोपा कॅच सोडला.

  • 25 Apr 2021 04:52 PM (IST)

    चेन्नईला सलग 2 झटके

    हर्षल पटेलने चेन्नईला सलग 2 झटके दिले आहेत. हर्षलने आधी सुरेश रैनाला बाद केलं. त्यानंतर फॅफ डु प्लेसीसला आऊट केलं.  रैनाने 24 तर फॅफने 50 धावांची खेळी केली. 
     
     
  • 25 Apr 2021 04:49 PM (IST)

    चेन्नईला दुसरा धक्का

    चेन्नईने दुसरी विकेट गमावली आहे. सुरेश रैना आऊट झाला आहे. रैनाने 18 चेंडूत 1 चौकार आणि 3 सिक्ससह 24 धावांची खेळी केली.

  • 25 Apr 2021 04:47 PM (IST)

    फॅफ डु प्लेसिसचे अर्धशतक

    फॅफ डु प्लेसिसने शानदार अर्धशतक झळकावलं आहे. फॅफने 40 चेंडूत हे अर्धशतक लगावलं आहे. फॅफचे हे सलग दुसरं अर्धशतक ठरलं आहे.

  • 25 Apr 2021 04:33 PM (IST)

    सुरेश रैनाचा क्लास सिक्स

    सुरेश रैनाने सामन्यातील 12 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर 76 मीटर लांबीचा सिक्स लगावला आहे.

  • 25 Apr 2021 04:25 PM (IST)

    चेन्नईचा 10 ओव्हरनंतर स्कोअर

    चेन्नईने 10 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 83 धावा केल्या आहेत. मैदानात फॅफ डु प्लेसीस आणि सुरेश रैना खेळत आहेत.

  • 25 Apr 2021 04:21 PM (IST)

    चेन्नईला पहिला धक्का

    चेन्नईला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड कॅच आऊट झाला आहे. ऋतुराजने 25 चेंडूत 4 चौकार आणि 1 सिक्ससह 33 धावांची खेळी केली.

  • 25 Apr 2021 04:05 PM (IST)

    चेन्नईच्या सलामी जोडीची पावर प्लेमध्ये अर्धशतकी भागीदारी

    चेन्नईने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये शानदार फलंदाजी केली आहे. चेन्नईच्या सलामीवीर जोडीने या पावर प्लेमध्ये अर्धशतकी भागीदारी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 6 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला. यासह चेन्नईच्या 51धावा पूर्ण झाल्या.

  • 25 Apr 2021 03:47 PM (IST)

    चेन्नईचा 3 ओव्हरनंतर स्कोअर

    चेन्नईने पहिल्या 3 ओव्हरनंतर बिनबाद 21 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसीस खेळत आहेत.

  • 25 Apr 2021 03:43 PM (IST)

    फॅफ डुचा जोरदार सिक्स

    फॅफ डुने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जोरदार सिक्स लगावला आहे.

  • 25 Apr 2021 03:33 PM (IST)

    फॅफ डु प्लेसीसची चौकाराने सुरुवात

    फॅफ डु प्लेसिसने चौकार लगावत आपल्या खेळीची सुरुवात केली आहे. फॅफने सामन्यातील पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजच्या बोलिंगवर फोर लगावला.

  • 25 Apr 2021 03:30 PM (IST)

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसीस मैदानात खेळत आहेत.

  • 25 Apr 2021 03:18 PM (IST)

    अशी आहे विराटसेना

    विराट कोहली (कर्णधार) , देवदत्‍त पडिक्‍कल, नवदीप सैनी, ग्‍लेन मॅक्‍सवेल, एबी डी व्हीलियर्स, डॅन ख्रिस्चियन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्‍मद सिराज, कायले जेमीन्सन आणि हर्षल पटेल.

  • 25 Apr 2021 03:17 PM (IST)

    चेन्नईची प्लेइंग इलेव्हन

    ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्‍लेसीस, ड्वेन ब्राव्हो, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी (कर्णधार), सॅम करन, इमरान ताहीर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.

  • 25 Apr 2021 03:06 PM (IST)

    चेन्नईने टॉस जिंकला

    चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

     

  • 25 Apr 2021 02:38 PM (IST)

    थोड्याच वेळात टॉस, आकड्यांमध्ये कोण बॉस?

    थोड्याच वेळाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सीएसके आणि आरसीबी यांच्यात टॉस होईल. टॉस जिंकणारा संघ रन्सचा पाठलाग करणं पसंत करेल. आयपीएलच्या खेळपट्टीवर दोन्ही संघांचा आज 28 वा सामना होणार आहे. यापूर्वी झालेल्या 27 सामन्यांमध्ये सीएसकेने 17 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने केवळ 9 वेळा विजय मिळविला आहे.