मुंबई | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. राजस्थानने बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरने एकही विकेट न गमावता 16.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक 101 धावांची नाबाद खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. बंगळुरुचा या मोसमातील हा सलग चौथा विजय ठरला. (rcb vs rr live score ipl 2021 match royal challengers bangalore vs rajasthan royals scorecard online wankhede stadium mumbai in marathi)
बंगळुरुने राजस्थानचा 10 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह बंगळुरुचा हा या मोसमातील सलग चौथा विजय ठरला आहे. यासह बंगळुरुने पॉइंट्सटेबलमध्ये 8 गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बंगळुरुने मोठा विजय साकारल्याने विराटसेनेला नेट रनरेटमध्ये मोठा फायदा झा
बंगळुरुचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने चौकार ठोकत 51 चेंडूत शतक झळकावलं आहे. देवदत्तच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं आहे. देवदत्त आयपीएलमध्ये शतक लगावणारा तिसरा युवा फलंदाज ठरला आहे.
बंगळुरुने राजस्थानवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. बंगळुरुचा हा या मोसमातील सलग चौथा विजय ठरला आहे. या विजयासह बंगळुरुने पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
And that's what we call a PERFECT 1️⃣0️⃣ performance ?
4️⃣ out of 4️⃣! ? #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #RCBvRR #DareToDream pic.twitter.com/bZpnEVn6e8
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 22, 2021
That’s a CENTURY for @devdpd07 ??
His maiden ? in #VIVOIPL
Live – https://t.co/qQv53pVLyV #RCBvRR #VIVOIPL pic.twitter.com/m2LG7t4zKO
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
बंगळुरुच्या विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल सलामी जोडीने 14 व्या ओव्हरमध्ये 17 धावा कुटल्या आहेत. यामध्ये 2 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे.
विराट कोहलीने कारनामा केला आहे. विराटने आयपीएलमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. विराटने चौकार ठोकत 6 हजार धावांटा टप्पा ओलांडला.
Stat alert! : Captain Kohli becomes the first batsman in IPL history to reach 6⃣K runs ?
Just a gentle flick for 4️⃣ more to get there ?#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #RCBvRR #DareToDream
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 22, 2021
कर्णधार विराट कोहलीने 34 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. विराटच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील 40 वं अर्धशतक ठरलं.
.@imVkohli joins the party with a fine FIFTY off 34 deliveries.
This is his 40th in #VIVOIPL
Live – https://t.co/qQv53pVLyV #RCBvRR #VIVOIPL pic.twitter.com/zXbCKbAMPg
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
कर्णधार विराट कोहलीने 13 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर सिक्स खेचला आहे.
देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली आहे. देवदत्तने खेचलेल्या सिक्ससह बंगळुरुने 100धावांचा टप्पा ओलांडला आहे.
A SIX from @devdpd07 and that's a brilliant 100-run partnership between the openers.
Live – https://t.co/dch5R4juzp #RCBvRR #VIVOIPL pic.twitter.com/Po1tv7hHEc
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
देवदत्तन पडीक्कलने 9 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूत सलग 2 सिक्स लगावले आहेत.
देवदत्त पडीक्कलने चौकारासह शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. देवदत्तने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.
Yeh hum hain, yeh Dev hain aur yahan PADI ho rahi hain.#TweetLikeOppositionAdmin #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #RCBvRR #DareToDream pic.twitter.com/ZIllwCCgSx
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 22, 2021
कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.
A fine 50-run partnership comes up between @imVkohli & @devdpd07 ??
Live – https://t.co/dch5R4juzp #RCBvRR #VIVOIPL pic.twitter.com/3DuJCnUFyE
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
देवदत्त पडीकक्लने 5 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सिक्स खेचला. यासह बंगळुरुच्या 49 धावा पूर्ण झाल्या आहेत.
देवदत्त पडीक्कलने सामन्यातील चौथ्या ओव्हरमध्ये सलग 2 चेंडूत 2 चौकार लगावले आहेत.
देवदत्त पडीक्कलने श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार लगावले आहेत. यासह देवदत्त 14 धावांवर पोहचला आहे.
बंगळुरु आणि कर्णधार विराट कोहलीने सिक्स लगावत सुरुवात केली आहे. विराटने श्रेयस गोपाळच्या बोलिंगवर सिक्स लगावला.
Match 16. 0.4: S Gopal to V Kohli, 6 runs, 6/0 https://t.co/qQv53qdmXv #RCBvRR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 177 धावा केल्या आहेत. शिवम दुबेने 46 तर राहुल तेवतियाने 40 धावांची झुंजार खेळी केली. बंगळुरुकडून मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
Shaky start ➡️ Solid finish. Time to defend this!#HallaBol | #RoyalsFamily | #IPL2021 | #RCBvRR pic.twitter.com/Kbvvp009MI
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2021
राजस्थानने आठवी विकेट गमावली आहे. ख्रिस मॉरीस आऊट झाला आहे.
राजस्थानने सातवी विकेट गमावली आहे. राहुल तेवतिया 40 धावा केल्या.
राहुल तेवतियाने 19 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजच्या बोलिंगवर सिक्स लगावला आहे.
ख्रिस मॉरिसने 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कायले जेमिन्सच्या गोलंदाजीवर सिक्स खेचला. यासह राजस्थानचा स्कोअर 18 ओव्हरनंतर 6 बाद 157 असा झाला आहे.
राजस्थानने 15 ओव्हरनंतर 5 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आहेत. शिवम दुबे आणि राहुल तेवतिया मैदानात खेळत आहेत.
राहुल तेवतियाने सिक्स खेचत आपल्या खेळीची सुरुवात केली आहे.
रियान परागने चौकार ठोकला आहे. या चौकारासह राजस्थानच्या 100 धावा पूर्ण केल्या आहेत.
राजस्थानने 12 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 96 धावा केल्या आहेत. शिवम दुबे आणि रियान पराग मैदानात खेळत आहेत.
राजस्थानने 10 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 70 धावा केल्या आहेत. शिवम दुबे आणि रियान पराग मैदानात खेळत आहेत.
At the halfway mark #RR are 70/4
Live – https://t.co/dch5R4juzp #RCBvRR #VIVOIPL pic.twitter.com/upJqiJubj0
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
शिवम दुबेने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर 9 व्या ओव्हरमध्ये दमदार सिक्स लगावला आहे.
शिवम दुबेने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर 9 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर 83 मीटरचा शानदार सिक्स लगावला आहे.
राजस्थानने पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून 32 धावा केल्या आहेत. कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे मैदानात खेळत आहेत.
#RR lose three wickets in the powerplay with 32 runs on the board.
Live – https://t.co/dch5R4juzp #RCBvRR #VIVOIPL pic.twitter.com/BUzGazwPgG
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
राजस्थानला तिसरा धक्का बसला आहे. डेव्हीड मिलर आऊट झाला आहे.
A brilliant review from #RCB and David Miller departs for a duck.
Wicket No.2 for @mdsirajofficial ?
Live – https://t.co/qQv53pVLyV #RCBvRR #VIVOIPL pic.twitter.com/vArSKpzWCZ
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
राजस्थानला दुसरा धक्का बसला आहे. मनन वोहरा कॅच आऊट झाला आहे. वोहरा 7 धावा करुन बाद झाला.
राजस्थानने पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर जोस बटलर आऊट झाला आहे. मोहम्मद सिराजने बटलरला बोल्ड केलं आहे.
Match 16. 2.3: WICKET! J Buttler (8) is out, b Mohammed Siraj, 14/1 https://t.co/qQv53qdmXv #RCBvRR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
जॉस बटलर आणि राजस्थानची चौकाराने सुरुवात झाली आहे. राजस्थानने पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकारांसह 8 धावा केल्या आहेत.
राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. जॉस बटलर आणि मनन वोहरा सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, एबी डिव्हीलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमीन्सन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल
संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), जॉस बटलर, मनन वोहरा, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, शिवम दुबे, ख्रिस मोरिस, श्रेयस गोपाळ, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन साकरिया
या सामन्यासाठी दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या जागी लेग स्पिनर श्रेयस गोपाळला संधी देण्यात आली आहे. गोपळचा एबी डी व्हीलियर्स आणि विराट कोहली विरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे.
तसेच बंगळुरुमध्येही एकमेव बदल करण्यात आला आहे. रजत पाटीदारच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या केन रिचर्डसनला संधी दिली आहे. बंगळुरुकडून रिचर्डसनचा हा पहिलाच सामना आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकला आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Match 16. Royal Challengers Bangalore win the toss and elect to field https://t.co/qQv53qdmXv #RCBvRR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 16 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे.
Hello and welcome to Match 16 of #VIVOIPL where @imVkohli led #RCB will take on @IamSanjuSamson's #RR.
Who are you rooting for?#RCBvRR pic.twitter.com/YjEuYomSZ9
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021