मुंबई | कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करण्यात आला. त्यामुळे आता उर्वरित सामने कुठे खेळवण्यात येणार, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. तसेच बीसीसीआयसमोर (BCCI) उर्वरित सामन्यांचे आयोजनाचं मोठं आव्हान आहे. या 14 व्या मोसमाला 9 एप्रिलला सुरुवात झाली. त्यानंतर 2 मे पर्यंत 29 सामने खेळवण्यात आले. त्यामुळे आता एकूण 31 सामने बाकी आहेत. त्यामुळे हे उर्वरित सामने कुठे खेळवायचे, असा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे. हे सामने सप्टेंबर 2021 मध्ये खेळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मात्र अजूनही याबाबत काहीच ठरलेलं नाही. (remaining 31 matches of IPL 2021 are likely to be played in the UAE Australia or England)
टाइम्स ऑफ इंडियानुसार, “आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन हे भारतात होणार नाही. हे सामने दुसऱ्या देशात खेळवण्यात येतील. तसेच बीसीसीआ या सामन्यांचे आयोजन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करु शकते. या महिन्यां दरम्यान इतर कोणत्याही क्रिकेट मालिका प्रस्तावित नाही. त्यामुळे ही वेळ योग्य आहे. भारतात कोरोनाचा प्रसार वाढतोय. त्यामुळे परदेशी खेळाडू उर्वरित सामन्यांसाठी पुन्हा भारतात येणार नाहीत. परदेशी खेळाडू हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. ते नसले तर या स्पर्धेला अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. टीओआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ” उर्वरित सामने परदेशातच खेळवले जातील. याबाबत अनेकांकडून मत मांडली जात आहेत. याबाबत काहीच ठरलं नाही.”
बीसीसीआयसमोर उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी 3 पर्याय आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा यूएईमध्ये मॅचेस खेळवण्यात येऊ शकता. आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते. त्यावेळेस यशस्वीरित्या या हंगामाचं आयोजन केले होते.
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबरला संपेल. त्यानंतर इंग्लिश खेळाडू हे थेट यूएईला येऊ शकतात. उर्वरित सामने पूर्ण झाल्यानंतर एका आठवड्याच्या क्वारंटाईननंतर वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दरम्यानच्या काळात हे सामने खेळवण्यात येऊ शकतात. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन 22 ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित आहे. मात्र यूएईमध्ये वातावरणाबाबत डोकेदुखी आहे. सप्टेंबरमध्ये इथे मोठ्या प्रमाणात वातावरण गरम असतं. ऑक्टोबरनंतर उष्णता ओसरायला सुरुवात होते.
या सामन्यांच्या आयोजनासाठी यूएईसह इंग्लंड आणि ऑस्टेलियाही स्पर्धेत आहे. इंग्लंडमध्ये आयोजन झाल्यास टीम इंडिया आणि इंग्लिश खेळाडूंसाठी ते फायदेशीर ठरेल. तसेच इतर खेळाडूंसाठीही हे सोयीचे ठरेल. तर इंग्लंडमधील वातावरणही सरासरी असतं. राहिला प्रश्न तर ऑस्ट्रेलियाचा. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. मात्र त्यावरही कोरोनाची टांगती तलवार आहे. त्यामुळे जर या वर्ल्ड कप स्पर्धेच आयोजन ऑस्ट्रेलियात झाल्यास उर्विरत सामने तिथे खेळवता येतील. मात्र याबाबत अजूनही चर्चाच आहे. त्यामुळे उर्वरित सामने केव्हा आणि कुठे खेळवण्यात येणार, हे येत्या काळातच समजेल.
संबंधित बातम्या :
(remaining 31 matches of IPL 2021 are likely to be played in the UAE, Australia or England)