Video : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का?

| Updated on: May 27, 2021 | 7:28 AM

रिषभ पंत 'वजन'दार खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी वा आयपीएल स्पर्धेअगोदर त्याने वजन कमी केलं असलं तरी आणखीही तो तेवढाच वजनदार खेळाडू दितो. अशा वजनदार खेळाडूंना जीममध्ये जरा जास्त घाम गाळावा लागतो. (Rishabh pant gym Workout Video Before WTC Final 2021)

Video : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का?
रिषभ पंत
Follow us on

मुंबई :  भारताचा इंग्लंड दौरा येत्या काहीच दिवसांत सुरु होतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याला 18 जूनपासून साऊथहॅम्प्टन येथे सुरुवात होणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या आयसीसीच्या (ICC) कसोटी क्रमवारीतील पहिल्या दोन संघात हा सामना होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारताचा संघ (Indian Cricket Team) कसून सराव करत आहे. बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या एका व्हिडीओत भारताचा विकेट कीपर बॅट्समन रिषभ पंतने (Rishabh pant) एक स्टंट केलाय, जो सध्या सोशल मीडियावर व्हारयल होतोय आणि नेटकरीही रिषभची तारीफ करताना दिसून येत आहेत. (Rishabh pant gym Workout Video Before WTC Final 2021)

न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे खेळाडू परिश्रम घेत असून जीममध्येही घाम गाळताना दिसून येत आहेत. भारतीय खेळाडूंच्या जिम सत्राचा एक व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सगळेच खेळाडू विविध प्रात्याक्षिकं करताना दिसून येत आहेत. यामध्ये लक्ष वेधून घेतलंय ते विकेट कीपर फलंदाज रिषभ पंतने…!

रिषभ पंतचा स्टंट

रिषभ पंत ‘वजन’दार खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी वा आयपीएल स्पर्धेअगोदर त्याने वजन कमी केलं असलं तरी आणखीही तो तेवढाच वजनदार खेळाडू दितो. अशा वजनदार खेळाडूंना जीममध्ये जरा जास्त घाम गाळावा लागतो. रिषभने जीममध्ये त्याचा आवडता स्टंट केला जो मैदानावर तो नेहमी करताना दिसून येतो. वजन जास्त असल्याने रिषभ हा स्टंट करु शकणार नाही, असं पाहणाऱ्याला वाटतं पण रिषभ तो स्टंट लिलया करतो.

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघ मुंबईत क्वारंटाईन

कोरोनाच्या नियम आणि अटींच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाला सध्या क्वारंटाईन राहावे लागत आहे. भारतीय खेळाडूंना आधी भारतातील त्यानंतर इंग्लंडमधील बायो-बबलचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार असून तोपर्यंत सर्व खेळाडू विलगीकरणात आहेत. इंग्लंडला गेल्यानंतरही संपूर्ण संघाला 10 दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. या दोन्ही बायो-बबलमध्ये खेळाडूंची वारंवार कोरोना चाचणी केली जाणार आहे.

फिटनेस टेस्ट अनिवार्य

अलीकडे क्रिकेटमध्ये फिटनेसवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात असल्याचे दिसून येते. कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) तर जगभरातील फिटेस्ट खेळाडूंमध्ये गणले जाते. त्यामुळे संघात स्थान मिळवण्यासाठी उत्तम खेळासोबत सर्व फिटनेस टेस्टमध्ये पास होणेही अनिवार्य झाले आहे.

(Rishabh pant gym Workout Video Before WTC Final 2021)

हे ही वाचा :

धोनी लवकरच चेन्नईला गुड बाय करणार, चोप्रांची आकाशवाणी!

लेकाची आईला मिठी, बाप हार्दिकची खास कमेंट

WTC Final : भारताचे ‘हे’ दोन खेळाडू न्यूझीलंडसाठी मोठा धोका, फलंदाज हेन्री निकोल्सने वर्तवली चिंता