चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (Team India vs England 2nd Test) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना चेन्नईतील एम. ए. चिदंबरम (ma chidambaram stadium) स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दिवसखेर 1 विकेट गमावून 54 धावा केल्या आहेत. भारताकडे दुसऱ्या डावात 195 धावांची आघाडी आहे. यामुळे टीम इंडियाने दिवसखेर 249 रन्सची आघाडी घेतली आहे. सलामीवीर रोहित शर्मा 25 तर चेतेश्वर पुजारा 7 धावांवर नाबाद आहेत. (Rishabh Pant Rohit Sharma funny video emerges in Chennai Test)
या सामन्यात पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांसमोर 329 धावा उभारल्या. त्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार मारा करत इंग्लिश संघाला 134 धावात ऑल आऊट केलं. यावेळी भारतीय संघाने जबरदस्त क्षेत्ररक्षणही केलं. भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतच्या विकेटकीपिंगवरुन अनेकदा सवाल उपस्थित केले जातात. परंतु आज पंतने उत्तम क्षेत्ररक्षण करुन टीकाकारांचं तोंड बंद केलं. त्याने आजच्या सामन्यात दोन जबरदस्त झेल घेतले. तसेच डीआरएसशी संबंधित निर्णयांमध्येदेखील त्याने योगदान दिलं.
दरम्यान, सलामीवीर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत या दोघांमध्ये एक गंमतीदार प्रसंग पाहायला मिळाला. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा फलंदाज ओली स्टोन याने एक चेंडू मिट विकेटच्या दिशेने फटकावला. त्यावेळी रोहित शर्माने एक अप्रतिम झेल टिपला. स्टोन केवळ एकच रन करु शकला. यावेळी भारतीय संघ सेलिब्रेट करत असताना रोहित आणि ऋषभमध्ये एक गंमतीदार प्रसंग घडला. संघातील खेळाडू सेलिब्रेट करत असताना रोहित हलक्या हाताने ऋषभच्या डोक्यात मारताना दिसला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रोहित आणि ऋषभ एकमेकांची मस्करी करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
What was @ImRo45 doing to @RishabhPant17 here??! ??? #INDvENG #INDvsENG pic.twitter.com/h4DssKHHnI
— ?FlashScore Cricket Commentators (@FlashCric) February 14, 2021
या सामन्यादरम्यान विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंडच्या ओली पोपचा (Ollie Pope) हवेत झेपावत एकहाती कॅच घेतला. रिषभ पंतने घेतलेल्या या अफलातून कॅचनंतर त्याचं कौतुक करण्यात येत आहे. तसेच त्याच्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच पंत ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
Rishabh spidey pant pic.twitter.com/PDiBxi2AQ7
— Anuroop (@rohitfanboy45) February 14, 2021
मोहम्मद सिराज भारतात पहिल्यांदा बोलिंग करत होता. कॅप्टन विराटने सिराजला इंग्लंडच्या डावातील 39 वी ओव्हर टाकायला दिली. सिराजने आपल्या कोट्यातील शॉर्ट बोल टाकला. हा बोल लेग साईडच्या दिशेने जात होता. या चेंडूवर पोपने फटकावण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटला स्पर्श करत विकेटकीपर पंतच्या दिशेने निघाला. चेंडू पंतपासून थोडा दूर होता. पण पंतने वेळीच हवेत झेपावत शानदार कॅच घेतला.
When in Chennai, you #WhistlePodu! ??#TeamIndia skipper @imVkohli egging the Chepauk crowd on & they do not disappoint. ?? @Paytm #INDvENG
Follow the match ? https://t.co/Hr7Zk2kjNC pic.twitter.com/JR6BfvRqtZ
— BCCI (@BCCI) February 14, 2021
संबंधित बातम्या :
India vs England 2nd Test | इंग्लंडच्या गोलंदाजांची अफलातून कामगिरी, 66 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक
India vs England 2nd Test | अश्विनची फिरकी इंग्लंडला गिरकी, ठरला पहिलाच गोलंदाज
(Rishabh Pant Rohit Sharma funny video emerges in Chennai Test)