BCCI : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूची नियुक्ती

| Updated on: Oct 18, 2022 | 1:21 PM

आज त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

BCCI : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूची नियुक्ती
BCCI : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूची नियुक्ती
Follow us on

मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून बीसीसीआयच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेची (General Meeting) सगळीकडे चर्चा आहे. कारण होणाऱ्या सभेत बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळणार होता. आजच्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडू रोजर बिन्नी (Roger Binny) यांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या सदस्याची बैठक मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झाली.

आजच्या बैठकीला रोजर बिन्नी, बीसीसीआयचे सचिव जय शाह, माजी अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंह धूमल यांची उपस्थित बैठक पार पडली.

67 वर्षीय रोजर बिन्नी यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. आज त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

कर्नाटक क्रिकेट बोर्डाचं अध्यक्षपद त्यांनी संभाळलं आहे. आत्तापर्यंत ते कर्नाटक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. आता त्यांना ते पद सोडावं लागेल. 1983 मध्ये ज्यावेळी टीम इंडियाने विश्वचषक जिंकला, त्यावेळी रोजर बिन्नी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यावेळी त्यांनी आठ मॅचमध्ये अठरा विकेट घेतल्या होत्या.