मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) इतिहासात असा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावावर एका आयपीएल हंगामात 300 पेक्षा अधिक धावांची नोंद आहे तसंच आपल्या बोलिंगनेही कमाल करत हॅट्रिकची नोंद केलीय, त्या खेळाडूचं नाव हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma)… रोहित शर्माची जशी आक्रमक खेळाडू म्हणून ओळख आहे तशीच चलाख, बुद्धीवान खेळाडू म्हणूनही…! ओपनिंगला येऊन प्रतिस्पर्धी बोलर्सवर हल्ला चढवायचा आणि संघाला गरज असेल त्यावेळी बोलिंग टाकून महत्त्वाच्या विकेट घ्यायच्या, हे रोहित जमतं. अलीकडच्या काही काळात रोहितने फारशी बोलिंग केली नाही. पण ही गोष्ट आहे आयपीएल 2009 ची… ज्या हंगामात रोहितने 300 पेक्षा अधिक धावा फटकावून हॅट्रिकची नोंद आपल्या नावे केली होती. (Rohit Sharma 300 Plus Runs In 1 IPL Seoson And hatrik Wicket)
रोहित शर्माने 2009 च्या आयपीएल हंगामात कारनामा केली होता. डेक्कन चार्जर्सकडून (Deccan Chargers) खेळताना रोहितने एका हंगामात 365 धावा ठोकून मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (Mumbai Indians) मॅचमध्ये हॅट्रिकची नोंद केली होती. मुंबईच्या 3 फलंदाजांना लागोपाठ रोहितने पॅव्हॅलिएनचा रस्ता दाखवला.
आयपीएल 2009 चा हंगाम लोकसभा निवडणुकीमुळे दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला. हा आयपीएलचा 2 रा हंगाम होता. दुसऱ्या हंगामाच्या 32 व्या मॅचमधील 15 व्या ओव्हरमध्ये रोहितने कमाल केली. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अभिषेक नायरला तर सहाव्या बॉलवर हरभजन सिंगला आऊट केलं. 2 बॉलवर 2 विकेट्स घेतल्यानंतर कर्णधाराने रोहित शर्माच्या हाती पुन्हा पुढच्या ओव्हरमध्ये बॉल दिला. रोहित शर्मानेही कमाल केली. ओव्हर्सच्या पहिल्याच बॉलवर रोहितने जे.पी. ड्युमिनीला आऊट करुन आपलं हॅट्रिक पूर्ण केली.
आयपीएल 2021 मध्ये खास रेकॉर्ड करण्याची रोहितला संधी आहे. आपल्या नेतृत्वाखाली रोहितने पाच वेळा मुंबईला आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं आहे. तसंच या आयपीएलमध्ये मुंबईसाठी 4500 रन्स बनविणयाचा पराक्रमही केवळ रोहित शर्माच्याच नावावर होऊ शकतो. सध्या त्याच्या नावावर मुंबईकडून खेळताना 4333 रन्स आहेत. आणखी 167 रन्स त्याच्या नावावर मुंबईसाठी 4500 रन्स होऊ शकतात.
हे ही वाचा :
MS धोनीचा करेक्ट कार्यक्रम, कोच स्टीफन फ्लेमिंग यांचा बर्थडे सहकाऱ्यांबरोबर खास अंदाजात सेलिब्रेट!
IPL 2021 : कोरोनाने सीमारेषा ओलांडली, वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना लागण
Video : ‘उडता अशरफ’, सुप्पर से भी उप्पर कॅच; तुम्हीही बघत राहाल!