पुणे : टेस्ट आणि टी 20 सीरिजनंतर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 23 मार्चपासून एकदिवसीय (India vs England Odi Series 2021) मालिकेला सुरुवात होत आहे. या वनडे सीरिजमध्ये 3 सामने खेळण्यात येणार आहेत. या सामन्यांचे आयोजन पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या मालिकेआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मोठी घोषणा केली आहे. या मालिकेत सलामीला कोण खेळणार, याबाबतचा खुलासा विराटने केला आहे. (rohit sharma and shikhar dhawan will opening in india vs england odi series says virat kohli)
‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि ‘गब्बर’ शिखर धवन (Shikhar Dhawan) ही जोडी या मालिकेत सलामी करणार आहेत. याबाबतची माहिती विराटने दिली. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस विराट बोलत होता. विराटने यादरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
“मुंबईकर सूर्यकुमार यादवने टी 20 मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याला या कामिगरीच्या जोरावर एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं. सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची की नाही,याबाबत आम्ही ठरवू”, असं विराटने नमूद केलं.
शिखर धवनला इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे शिखरला संघातून वगळण्यात आले. मात्र त्यानंतरही निवड समितीने शिखर धवनवर विश्वास दाखवला. शिखरची एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली. त्यामुळे शिखरसमोर या 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.
उभय संघात आतापर्यंत एकूण 100 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ आहे. भारताने इंग्लंडचा 53 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर इंग्लंडने टीम इंडियावर 42 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. 2 सामने बरोबरीत सुटले आहेत. तर 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.
(rohit sharma and shikhar dhawan will opening in india vs england odi series says virat kohli)