ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) भारताचा T20 पहिला सामना असल्याने मैदानात चाहत्यांची (Cricket Fan) गर्दी अधिक होती. आशिया चषकात (Asia Cup) पदरी निराशा पडल्यानंतर पुन्हा चांगली सुरुवात होईल अशी आशा चाहत्यांना होती. परंतु चाहत्यांची पुर्णपणे निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. कारण पुन्हा गोलंदाज अपयशी ठरले आहेत.
काल प्रथम फलंदाजी करीत असताना भारतीय फलंदाजांनी त्यांची कामगिरी व्यवस्थितपणे निभावली त्यामुळे धावसंख्या 200 धावसंख्या उभारली. परंतु गोलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केल्याने ऑस्ट्रेलिया टीम सहज विजयी झाली.
आशिया चषकाच्या अंतिम मॅचमध्ये खराब गोलंदाजीमुळे खेळाडूंवरती जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच चांगल्या खेळाडू असताना खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना का संधी दिली आहे, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता.
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी ज्यावेळी टीम इंडीयाची निवड करण्यात आली, त्यावेळी चांगल्या गोलंदाजांना संधी न मिळाल्यामुळे त्यांच्यावरती जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच चांगल्या गोलंदाजांना घ्यायला हवं असंही दिग्गजांनी सांगितलं होतं.
रोहित शर्माने काल खराब गोलंदाजी करणाऱ्या सगळ्या गोलंदाजांना दोषी धरले आहे. कारण धावसंख्या मोठी असताना, त्यांच्याकडून अजिबात कसल्याही प्रकारची चांगली गोलंदाजी झाली नाही असंही रोहित म्हणाला.