Rohit Sharma : वाइड बॉल न दिल्याने रोहित शर्मा संतापला, अंपायरला म्हणाला…

| Updated on: Oct 03, 2022 | 10:35 AM

विशेष म्हणजे वाईड बॉल आणि नो बॉलसाठी अजिबात रिव्यू नसतो.

Rohit Sharma : वाइड बॉल न दिल्याने रोहित शर्मा संतापला, अंपायरला म्हणाला...
Rohit-sharma
Image Credit source: Screengrab
Follow us on

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगल्या फलंदाजीसाठी अधिक प्रसिद्ध आहे. आशिया चषकाच्या स्पर्धेतून टीम इंडिया (Team India) बाहेर गेल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधार पदावरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Australia) मालिका जिंकून त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आफ्रिकेविरुद्धच सुद्धा त्याच्या कर्णधार पदाच्या काळात टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत त्याच्याकडून चांगल्या खेळी होईल अशी चाहत्यांना आशा आहे.

कालच्या सामन्यात सुरुवातीच्या काळात दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. रोहित शर्माने ज्यावेळी पंचाकडे वाईड बॉल मागितला. त्यावेळी पंचांनी त्याला नकार दिला. त्यामुळे रोहित शर्माने रिव्यू मागितला.

दुसरी मॅच सुरु झाली, त्यावेळी रोहित शर्मा आणि केएल राहूल दोघेही मैदानात होते. त्यावेळी आफ्रिकेचा गोलंदाज वेन पार्नेल हा गोलंदाजी करीत होता. त्यावेळी रोहित स्ट्राईकला होता, बॉल वाईड असल्याचं रोहित अंपायरला खुणावलं, पण तो देत नसल्याने रोहित कालच्या सामन्यात रागावला.

विशेष म्हणजे वाईड बॉल आणि नो बॉलसाठी अजिबात रिव्यू नसतो. पण अंपायर देत नसल्याने रोहितने डिआरएसची मागणी केली.