रोहित शर्मानं त्याच पिचवर ऑस्ट्रेलियाला दिली Live कोचिंग, दीड तासात शिकवलं कशी करतात बॅटिंग

| Updated on: Feb 09, 2023 | 9:36 PM

रोहित शर्माने 69 चेंडूत 56 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. रोहितने 81.16 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत नाबाद राहिला. रोहितसह राहुलने पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली.

रोहित शर्मानं त्याच पिचवर ऑस्ट्रेलियाला दिली Live कोचिंग, दीड तासात शिकवलं कशी करतात बॅटिंग
रोहित शर्मानं करुन दाखवलं, त्याच पिचवर कांगारुंचा घेतला दीड तास क्लास
Image Credit source: BCCI Twitter
Follow us on

नागपूर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये सुरु आहे. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला 177 धावांवर सर्वबाद करत सामन्यावर पकड मिळवण्याच्या दृष्टीने पाऊल उचललं आहे. सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या आजी माजी खेळाडूंनी नागपूर खेळपट्टीवर टीका केली होती.सामन्यापूर्वी नागपूरमधील पिचचा आढावा ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याने घेतला होता. त्यानंतर मीडियाशी चर्चा करताना पिचबाबत संशय व्यक्त केला होता. सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला. स्टीव्ह स्मिथही 37 धावा करून रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात अशी स्थिती पाहून पुन्हा एकदा पिचवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. मात्र भारताचा कर्णधार रोहित शर्मानं त्याच खेळपट्टीवर दीड तास धरून अर्धशतक ठोकलं आणि कांगारुंची तोंड बंद केली. रोहितनं दाखवून दिलं की फिरकीपटूंना कशी पद्धतीने सामोरं जायचं असतं.

रोहित शर्माने 69 चेंडूत 56 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. रोहितने 81.16 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत नाबाद राहिला. रोहितसह राहुलने पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. नागपूर कसोटीच्या एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन मीडियाला स्पष्टपणे सांगितलं होतं की, “खेळाडूंनी पिचऐवजी खेळावर लक्ष केंद्रीत करावं.” पण ऑस्ट्रेलियन संघाने पिचवर लक्ष केंद्रीत केलं.

ऑस्ट्रेलियाचा पहिली इनिंग

ऑस्ट्रेलियाकडून एकही खेळाडू खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. पण दुसऱ्या षटकातच ऑस्ट्रेलियाला उस्मान ख्वाजाच्या रुपाने पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजनं त्याला अवघ्या एका धावेवर पायचीत केलं.त्यानंतर लगेचच तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजनं डेविड वॉर्नरला बाद केलं. ऑस्ट्रेलियन संघ दबावात असताना मार्सन लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ जोडीनं डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी केली. मात्र केएस भारतनं चपळतेने केलेल्या स्टंपिंग करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेला मॅट रेनशॉ भोपळाही फोडू शकला नाही. जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. स्टीव स्मिथ 37, एलेक्स कॅरे 36, पॅट कमिन्स 6, टोड मर्फी 0, पीटर हँडस्कॉम्ब 31, स्कॉट बोलँड 1 अशा धावा करून बाद झाले.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.