Ind vs Aus : याला म्हणतात खरा कॅप्टन! रोहित रन आऊट, पण तरीही होतंय कौतुक, पाहा Video

| Updated on: Feb 19, 2023 | 3:18 PM

रोहित शर्माला दुसऱ्या डावात फलंदाजी करताना एक चूक महागात पडली. यामळे तो रन आऊट झाला. आपली विकेट गमवावी लागली मात्र तरीपण त्याचं सोशल मीडियावर कौतुक का होतंय ते पाहा!

Ind vs Aus : याला म्हणतात खरा कॅप्टन! रोहित रन आऊट, पण तरीही होतंय कौतुक, पाहा Video
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामना खिशात घातला.115 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 4 गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं. या सामन्यामध्ये फॉर्ममध्ये असलेला कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावात फलंदाजी करताना एक चूक महागात पडली. यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली. रोहित रन आऊट झाला असला तरी त्याचं सोशल मीडियावर कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं?
सामन्याच्या 7 ओव्हरमध्ये रोहितने कुहमेनच्या पाचवा बॉल मिड-विकेटच्या दिशेने मारला. रोहितला दोन धावा हव्या होत्या. त्यासाठी त्याने पहिली धाव जोरात घेतली आणि दुसरी धाव घेण्यासाठी माघारी परतला तेव्हा त्याने पाहिलं की पीटर हँड्सकॉम्ब थ्रो करत आहे. मात्र पुजारा आधीच रोहितच्या कॉलमुळे दुसरी धाव घेण्यासाठी निघाला होता. पुजाराला रोहित थांबवणार मात्र तो जवळपास अर्ध्या क्रीजपर्यंत आला होता.

 

100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला परत माघारी लावलं असतं तर तो बाद झाला असता. रोहितने त्यावेळी पुजाराला काही न बोलता आपली दुसरी धाव पूर्ण केली मात्र पीटर हँड्सकॉम्बचा थ्रो आला होता कीपरने त्याला बाद केलं होतं. रोहित माघारी फिरू शकला असता तर पुजारा बाद झाला असता मात्र रोहितने तसं न करता त्याच्या चुकीचा पुजाराला फटका बसू नये यासाठी आपली विकेट बहाल केली. रोहित शर्माच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. रोहित रन आऊट झाला मात्र त्याने चाहत्यांची मन जिंकलीत.

दरम्यान, या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला होता. त्यानंतर आता दुसरा कसोटी सामना भारताने 6 गडी राखून जिंकला आहे. मोठ्या विजयामुळे भारताला आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आता फक्त दोन अंकांचा फरक पडला आहे.