टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मागील काही दिवसांपासून चिंतेत होता. कारण गोलंदाजांकडून मॅचमध्ये योग्य अशी साथ मिळत नव्हती. आशिया चषकातून (Asia Cup 2022) बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मासह सगळ्या खेळाडूंवरती जोरदार टीका झाली होती. विशेष म्हणजे भुवनेश्वर कुमारची (Bhuvneshwar Kumar) सुद्धा सोशल मीडियावर चांगली चर्चा होती. कालची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच जिंकल्यानंतर रोहित शर्माने एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे त्याची देखील चाहत्यांमध्ये अधिक चर्चा आहे.
सुरुवातीला फलंदाजी करीत असताना, ऑस्ट्रेलियाने टीम इंडीयाच्या गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 187 झाली होती. सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 69 धावा केल्या. त्यामध्ये त्याने पाच षटकार आणि पाच चौकार लगावले.
विराट कोहली काल चांगल्या लयमध्ये दिसत होता. त्याने मैदानात थांबून योग्य पद्धतीने फटकेबाजी केली. त्याची तुफान बल्लेबाजी पाहिल्याने चाहते एकदम खूष दिसत होते. त्याने 48 चेंडूत 63 धावा काढल्या. चार षटकार आणि तीन चौकारांची आतषबाजी त्याने केली.
ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकल्यानंतर विश्वचषकाआधी टीम इंडिया फिल्डींग आणि गोलंदाजावरती लक्ष द्यावं लागेल असं विधान रोहित शर्माने केलं आहे. त्यामुळे येत्या काळात टीम इंडियामध्ये चाहत्यांना मोठा बदल पाहायला मिळणार आहे.