टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियात (Australia) दाखल झाल्यापासून त्याचा जोरात सराव सुरु आहे. येत्या रविवारपासून टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या टीमनी आत्तापासून डावपेच आखायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टया तेज गोलंदाजांसाठी अधिक चांगल्या असतात.
टीम इंडियाचा पहिला सराव ऑस्ट्रेलिया टीम ए सोबत झाला. त्यावेळी फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे सहज विजय मिळविता आला. परंतु ऑस्ट्रेलिया वेस्टर्न विरुद्ध खेळताना टीम इंडियाचा पराभव झाला.
दोन्ही सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजी केली नाही. त्यांनी इतर खेळाडूंना प्राधान्य दिलं. त्यामुळे इतर खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली.
Captain Rohit Sharma in full show in the practice session. pic.twitter.com/jytiNCD2SE
— Johns. (@CricCrazyJohns) October 13, 2022
मॅच झाल्यानंतर सराव करीत असताना रोहित शर्माने एक जोराचा षटकार मारला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियातील खेळाडूंची नावे
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.