मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंची T20 विश्वचषक स्पर्धेत ( T20 World Cup) खराब कामगिरी केली, त्यानंतर टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार असल्याचं सुचक विधान बीसीसीआयनं (BCCI) केलं होतं. काही दिवसांपुर्वी टीम इंडियाची निवड समिती बरखास्त करण्यात आली. सध्या नव्या निवड समितीची प्रक्रिया सुरु झाली आहे. टीम इंडियाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना T20 टीममध्ये संधी मिळणार नसल्याचं बीसीसीआयच्या सुत्रांनी मीडियाला सांगितलं आहे. त्याचबरोबर टीम इंडियात मोठा बदल होणार असल्याचं सुद्धा बीसीसीआयनं स्पष्ट केलं होतं.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार T20 टीम इंडियामध्ये यापुढे रोहित शर्मा, विराट कोहली, आश्विन आणि अन्य सिनिअर खेळाडू दिसणार नाहीत. T20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडिया नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. त्या टीमचं नेतृत्व टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दीक पांड्याला देऊ शकतात.
बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंना T20 फॉरमॅटमधून निवृ्त्ती घ्या असं अद्याप सांगितलेलं नाही. परंतु एकदिवसीय आणि कसोटीकडे लक्ष देण्याची सुचना केली आहे. ज्या खेळाडूंना T20 घ्यायची नसेल त्यांना जबरदस्ती नाही. पण पुढच्या काळात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
T20 वर्ल्ड कप 2024 च्या आगोदर टीम इंडिया 25 सामने खेळणार आहे, एकदिवसीय होणाऱ्या सामन्यात टीम इंडियामध्ये अनेक वरिष्ठ खेळाडूंना खेळवण्याची शक्यता आहे. कारण पुढच्यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्यांच्याकडून चांगली खेळी होऊ शकेल.