मेलबर्न : टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत झालेल्या दोन मॅच जिंकल्या आहे. उद्या टीम इंडियाची सि़डनी (sydney) येथील पर्थ (parth) मैदानात तिसरी मॅच होणार आहे. टीम इंडियाचे चार फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे.
आतापर्यंत टीम इंडियाने आफ्रिकेविरुद्ध झालेल्या 23 मॅच पैकी 13 मॅच जिंकल्या आहेत. तर 9 मॅचमध्ये पराभव झाला आहे.
मागच्या महिन्यात आफ्रिकेविरुद्ध झालेली मालिका टीम इंडियाने जिंकली. त्यावेळी सुर्यकुमार यादव, विराट कोहलीने गोलंदाजांची चांगली धुलाई केली. आजही ते खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. तसेच दोन विजय मिळाल्याने टीम इंडियातील खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.
ऑस्ट्रेलियात सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक काही मॅच रद्द झाल्या आहेत. तसेच त्या टीम एक-एक गुण देण्यात आला आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, दीपक हुडा
दक्षिण आफ्रिका टीम
क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा, रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नोर्टजे, लुंगी एनगिडी, हेन्रिक क्लासेन, तबरेझ शम्सी, रिझा हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स