नवी दिल्ली : फीफा विश्वकपाची (FIFA World Cup 2022) अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. उपांत्य फेरीतील चार करिष्माई टीम निश्चित झाल्या आहेत. शनिवारी उपांत्यपूर्व सामन्यात मोठा उलटफेर झाला. मोरक्कोने (Morocco) पुर्तगालवर अनपेक्षित विजय मिळविला आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली. मोरक्कोच्या या विजयाने स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोचे (Ronaldo) वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मैदानावरच जगाने दोन रंग पाहिले. एक मोरक्कोच्या विजयाचा तर दुसरा स्टार फुटबॉलर रोनोल्डाचा आश्रुचा बांध फुटतानाचा.
मोरक्कोने पोर्तुगालवर 1-0 असा विजय नोंदवला. सामना जसा संपला, रोनोल्डो मैदानावरच ढसाढसा रडला. आश्रू पुसताना रोनोल्डो मैदान सोडत असतानाचे क्षण उभ्या जगाने पाहिले आणि चाहते ही गहिवरले. 36 वर्षांच्या रोनोल्डोचा हा शेवटचा फुटबॉल विश्वकप होता. यानंतर तो विश्वकपमध्ये दिसणार नाही.
रोनाल्डोने यापूर्वीच पुढच्या विश्वकपमध्ये न खेळण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण हा विश्वकप अविस्मरणीय करण्याचे स्वप्न तो पूर्ण करु शकला नाही. उपांत्य पूर्व आणि उपांत्य सामन्यात रोनाल्डोला स्टार्टिंग 11 मध्ये उमेदवारी मिळाली नाही. तो नंतर मैदानात दाखल झाला. पण त्याला जादू दाखविता आली नाही.
Morocco’s Sofiane Boufal celebrating with his mother is EVERYTHING.
— Ahmed Ali (@MrAhmednurAli) December 10, 2022
एकीकडे रडणाऱ्या रोनोल्डाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्याचवेली मोरक्कोच्या खेळाडुंचा आनंद साजरा करणाऱ्या फोटोंनी चाहत्यांची उमेद जागवली. मोरक्कोच्या सुफियान बुफेल याने हा ऐतिहासीक विजय मैदानावरच साजरा केला. त्यावेळी त्याने मैदानावरच आईसोबत ताल धरला. दोघांनी विजयाचा आनंद साजरा केला.
मोरक्को साठी हा ऐतिहासिक विजय आहे. अफ्रिकन-अरब देशातील पहिली टीम पहिल्यांदा फुटबॉलच्या विश्वकपच्या उपांत्य फेरीत पोहचली आहे. 92 वर्षात पहिल्यांदा हा इतिहास घडला आहे. विशेष म्हणजे मोरक्कोचा किल्ला अभेद्य असून तो कोणालाच भेदता आलेला नाही.