शारजा : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 82 धावांनी मात केली. याविजयासह बंगळुरुने पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला केवळ 112 धावाच करता आल्या. (Ab de Villiers) एबी डीव्हिलियर्स आणि (Virat kohli) विराट कोहलीने दमदार खेळी केली. एबी डिव्हीलियर्सने 33 चेंडूत 5 फोर आणि 6 सिक्ससह नाबाद 73 धावा केल्या. तर विराट कोहलीने नाबाद 33 धावा केल्या. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली. एबीडी-विराटने 47 चेंडूत धमाकेदार 100 धावांची नाबाद भागीदारी केली. यासह या जोडीने आयपीएलमध्ये नवा किर्तीमान केला आहे. (Ab de Villiers and Virat kohli 10 Century Partnerships In Ipl )
8️⃣3️⃣ of these have come in the last 5️⃣. ? ? ? #PlayBold #IPL2020 #WeAreChallengers #Dream11IPL #RCBvKKR pic.twitter.com/Z1nPAH5l77
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) October 12, 2020
एबीडी आणि विराटने दहाव्यांदा शतकी भागीदारी करण्याचा कारनामा केला आहे. अशी कामगिरी करणारी ही पहिलीच जोडी ठरली आहे. याआधी अशी कामगिरी कोणालाही करता आली नाही. बंगळुरुसाठी याआधी ख्रिस गेल आणि विराट कोहली या जोडीने 9 वेळा शतकी भागीदारी केली आहे. सध्या ख्रिस गेल किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतोय. तर सनरायजर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि ‘गब्बर’ शिखर धवन या जोडीने 6 वेळा शतकी भागीदारी केली आहे.
Kohli-ABD become the first pair to share 10 century partnerships in IPL.
Most century pships in IPL:
10 KOHLI-ABD
9 Kohli-Gayle
6 Dhawan-Warner
5 Bairstow-Warner
5 Gambhir-Uthappa#IPL2020 #RCBvsKKR— Bharath Seervi (@SeerviBharath) October 12, 2020
या भागीदारीसह एबीडी-विराट या जोडीने आणखी एक विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत या जोडीने अनेकदा भागीदारी केली आहे. यासर्व भागीदारीतील एकूण धावा मिळवून 3 हजार धावा या जोडीने केल्या आहेत. याआधी आतापर्यंत विराट कोहली आणि ख्रिस गेल या जोडीने भागीदार म्हणून 2 हजार 782 धावा केल्या आहेत. तर शिखर धवन आणि डेव्हिड वार्नरने 2 हजार 357 धावा केल्या आहेत.
The AB-Virat partnership – 3000 runs and counting ??#Dream11IPL pic.twitter.com/DmjOlWs6hO
— IndianPremierLeague (@IPL) October 12, 2020
दरम्यान बंगळुरु यंदाच्या मोसमातील आपला पुढील सामना किंग्जस इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 15 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020 | दिल्लीला मोठा झटका, अमित मिश्रानंतर हा अनुभवी खेळाडू स्पर्धेला मुकणार
(Ab de Villiers and Virat kohli 10 Century Partnerships In Ipl )