मुंबई : राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.या सामन्याचे आयोजन मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium Mumbai) करण्यात आले होते. (rr vs kkr live score ipl 2021 match rajasthan royals vs Kolkata knight riders scorecard online wankhede stadium mumbai in marathi)
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने संयमी खेळी केली. संजूने 41 चेंडूत 2 फोर आणि 1 सिक्ससह नाबाद 42 धावा केल्या. संजू सॅमसनने कर्णधार पदाला साजेशी कामगिरी केली.
कोलकाताची वानखेडेवरील हा नववा पराभव ठरला आहे. कोलकाताने आतापर्यंत वानखेडेवर एकूण 10 सामने खेळले आहेत. यापैकी केवळ 1 सामन्यात कोलकाताचा विजय झाला आहे. तर उर्वरित 9 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
राजस्थानने कोलकातावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
WE WIN! ?
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 24, 2021
कोलकाताला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. डेव्हिड मिलर आणि कर्णधार संजू सॅमसन मैदानात खेळत आहेत.
राजस्थानला चौथा झटका लागला आहे. राहुल तेवतिया कॅच आऊट झाला आहे. तेवतियाने 5 धावा केल्या.
शुबमन गिलने सामन्यातील 13 व्या ओव्हरमध्ये राहुल तेवतियाला जीवनदान दिलं. राहुलने जोरदार फटका मारला. हा मारलेला फटका जवळपास सिक्स होता. मात्र शुबमनने सीमारेषेजवळ हा कॅच घेतला. मात्र बाऊंड्री लाईन जवळ असल्याने शुबमनचा तोल गेला. त्यामुळे त्याने चेंडू दुर फेकला. मात्र तो किती दूर फेकायचा याचा योग्य अंदाज शुबमनला लावता आला नाही. यामुळे राहुलला जीवनदान मिळालं.
राजस्थानने 11 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून 85 धावा केल्या आहेत. राजस्थानला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. कर्णधार संजू सॅमसन आणि राहुल तेवतिया मैदानात खेळत आहेत.
संजू सॅमसनने 9 वव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 74 मीटर लांबीचा सिक्सर लगावला आहे.
राजस्थानने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 50 धावा केल्या.
End of powerplay!
5⃣0⃣ runs for @rajasthanroyals
2⃣ wickets for @KKRiders #VIVOIPL #RRvKKRFollow the match ? https://t.co/oKLdD2Pi9R pic.twitter.com/9PRbPPaT9g
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2021
शिवम दुबेने 6 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर 74 मीटर लांबीचा सिक्स लगावला.
राजस्थानला दुसरा धक्का बसला आहे. यशस्वी जयस्वाल कॅच आऊट झाला आहे. यशस्वीने 17 चेंडूत 5 चौकारांसह 22 धावांची खेळी केली.
राजस्थानने चौथ्या ओव्हरमध्ये एकूण 3 चौकार लगावले. राजस्थानच्या 4 ओव्हरनंतर 1 आऊट 30 रन्स झाल्या आहेत.
कर्णधार संजू सॅमसनने चौकाराने सुरुवात केली आहे. वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर चौकार लगावला.
राजस्थानला पहिला धक्का बसला आहे.जॉस बटलर आऊट झाला आहे. वरुण चक्रवर्थीने बटलरला एलबीडबल्यू आऊट केलं.
यशस्वी जयसवालने दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग 2 चौकार लगावले आहेत.
राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. यशस्वी जयसवाल आणि जोस बटलर सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. कोलकाताने राजस्थानला विजयासाठी 134 धावांचे आव्हान दिले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे आव्हान दिले आहे. कोलकाताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने 25 तसेच नितीश राणाने 22 धावा केल्या. राजस्थानकडून ख्रिस मॉरीसने 4 विकेट्स घेतल्या.
133 to defend in the second innings.#RRvKKR pic.twitter.com/gvSM3OpWdH
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 24, 2021
कोलकाताला सातवा धक्का बसला आहे. दिनेश कार्तिक आऊट झाला आहे. कार्तिकने 25 धावा केल्या.
कोलकाताला पाचवा धक्का बसला आहे. राहुल त्रिपाठी बाद झाला. राहुल त्रिपाठीने 36 धावा केल्या.
कोलकाताने 13 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 76 धावा केल्या आहेत. राहुल त्रिपाठी 33 तर दिनेश कार्तिक 2 धावांवर नाबाद खेळत आहेत.
कोलकाताला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार इयोन मॉर्गन डायमंड डक झाला आहे. मॉर्गन शून्य धावांवर एकही चेंडू न खेळता रन आऊट झाला आहे.
कोलकाताने तिसरी विकेट गमावली आहे. सुनील नारायण कॅच आऊट झाला आहे. यशस्वी जयस्वालने शानदार कॅच घेतला. सुनीलने 6 धावा केल्या.
कोलकाताला दुसरा धक्का बसला आहे. नितीश राणा आऊट झाला आहे. नितीशने 25 चेंडूत 1 सिक्स आणि 1 फोरसह 22 धावा केल्या आहेत.
नितीश राणाने 7 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर जयदेव उनाडकटच्या बोलिंगवर सिक्स लगावला आहे.
कोलकाताने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर 1 विकेट्स गमावून 25 धावा केल्या आहेत.
OUT
Gill 11 (19) survived once when he was dropped by Jaiswal at sweeper cover but has to return now as an under-arm direct hit from Buttler finds him short of the crease.
Powerplay is over and #KKR are 25-1.
? https://t.co/oKLdD2Pi9R #VIVOIPL #RRvKKR pic.twitter.com/gDtr1FAKrL
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2021
कोलकाताला पहिला धक्का बसला आहे. शुबमन गिल 11 धावांवर रन आऊट झाला आहे.
कोलकाताने 5 ओव्हरनंतर बिनबाद 23 धावा केल्या आहेत. शुबमन गिल 11 तर नितीश राणा 10 धावांवर नाबाद खेळत आहेत.
यशस्वी जयसवालने शुबमन गिलला जीवनदान दिलं आहे. शुबमनने सामन्यातील चौथ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर फटका मारला होता. मात्र यशस्वीने ही कॅच सोडली.
शुबमन गिलने चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शानदार चौकार लगावला आहे.
नितीश राणाने सामन्यातील तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला आहे.
कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. शुबमन गिल-नितीश राणा सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयसवाल, जोस बटलर, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन साकरिया आणि मुस्तफिजुर रहमान.
ऑयन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.
Match 18. Kolkata Knight Riders XI: N Rana, S Gill, R Tripathi, E Morgan, S Narine, D Karthik, A Russell, P Cummins, S Mavi, V Chakaravarthy, P Krishna https://t.co/AkyLqHRgFW #RRvKKR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2021
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर मनन व्होराच्या जागी युवा यशस्वी जयस्वालला संधी दिली आहे. तर स्पिन श्रेयस गोपाळच्या जागी मीडियम पेसर जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच कोलकातामध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीऐवजी वेगवान गोलंदाज शिवम मावीचा समावेश करण्यात आला आहे.
Team News:
2⃣ changes for @rajasthanroyals as Yashasvi Jaiswal & Jaydev Unadkat named in the team.
1⃣ change for @KKRiders as Shivam Mavi picked in the team. #VIVOIPL #RRvKKR
Follow the match ? https://t.co/oKLdD2Pi9R
Here are the Playing XIs ? pic.twitter.com/FDsDv0mvSk
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2021
राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आहे. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता प्रथम फलंदाजी करणार आहे.
Toss Update: @rajasthanroyals have elected to bowl against @KKRiders at the Wankhede Stadium. #VIVOIPL #RRvKKR
Follow the match ? https://t.co/oKLdD2Pi9R pic.twitter.com/esC17PIpn2
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2021
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघ पॉइंट्स टेबसमध्ये तळाशी आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाच असणार आहेत.
Hello & good evening from Mumbai for Match 18 of the #VIVOIPL ??
The @IamSanjuSamson-led @rajasthanroyals will square off against @KKRiders, led by @Eoin16. ?? #RRvKKR
Which team will come out on top tonight? pic.twitter.com/qWAzZ0LRHr
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2021