मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेतील पहिला सामना जिंकला असून विजयी पताका कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस असणार आहे. संजू सॅमसन कि शिखर धवनचं नेतृत्व सरस ठरणार हे काही वेळात स्पष्ट होईल. राजस्थान रॉयल्सनं 2008 साली जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत पदरी अपयश पडलं आहे. तर पंजाब किंग्समध्ये महागडे खेळाडू असूनही अजूनपर्यंत यश मिळालेलं नाही.
राजस्थानला 4 बॉलमध्ये 14 धांवाची गरज
सामन्यात आली चुरस, 12 बॉलमध्ये 34 धावांची गरज
शिमरॉन हेटमारयर आणि ध्रुव जुरेल मैदानात
अर्शदीपने घेतली दुसरी विकेट
आर. आश्विन 0 धावा करून परतला असून आता संजू सॅमसन मैदानात आला आहे .
पंजाबची खराब सुरूवात 2 ओव्हर 1 विकेट 16 धावा
पंजाब किंग्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची निराशाजनक सुरूवात झाली आहे. यशस्वी जैस्वालला अर्शदीप सिंहने 11 धावांवर आऊट केलं. बटलर मैदानात आला आहे.
राजस्थान रॉयल्सच्या आर आश्विनच्या कॅरम बॉल खेळण्याात सिंकदर रझा अपयशी
शेवटच्या 5 ओव्हर्स राहिल्या असताना चहलने आपल्या शेवटच्या जितेश शर्मा याला 27 धावांवर बाद केलं आहे. फ्लाईट चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात जितेश फसला.
प्रभसिमरनने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत मोठे फटके खेळले. 23 चेंडूत त्याने 45 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे शिखर धवनने 13 चेंडूत 14 धावा केल्या आहेत.
पंजाबने 6 ओव्हरमध्ये बिनबाद 63 धावा केल्या असून मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना दिसत आहे.
पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांचे इम्पॅक्ट प्लेअरसाठीचे पर्यायी खेळाडू
पंजाब किंग्ज सब्स: ऋषी धवन, अथर्व तायडे, हरप्रीत सिंग भाटिया, मॅथ्यू शॉर्ट, मोहित राठी
राजस्थान रॉयल्स सदस्यः ध्रुव जुरेल, आकाश वसिष्ठ, मुरुगन अश्विन, कुलदीप यादव, डोनाव्हॉन फरेरा
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (W), शाहरुख खान, सॅम कुरान, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग
राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सनं कोलकात्याचा 7 धावांनी पराभव केला होता. सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबला 7 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं . तर राजस्थान रॉयल्सनं पहिल्याच सामन्यात सनराईजर्स हैदराबादचा 72 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे धावगतीत चांगली सुधारणा झाली आहे.
राजस्थान आणि पंजाबमध्ये कायमच चुरशीची लढाई राहिली आहे. दोन्ही संघांची आकडेवारीही असंच काहीसं सांगते. दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये एकूण 24 सामने खेळले आहेत. यात 14 मध्ये राजस्थान आणि पंजाबने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. मागच्या पाच सामन्यांचा विचार केला तर राजस्थाने 4 तर पंजाबने 1 सामना जिंकला आहे.