मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब सुपर किंग्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पंजाब किंग्सच्या सलामीला आलेल्या प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन यांनी चुकीचा ठरवला. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. तर प्रभसिमरन सिंगने आक्रमकपणे अर्धशतक ठोकलं. त्याने 28 चेंडूत 50 धावा केल्या.
विकेट्स हाती असल्यामुळे प्रभसिमरन सिंगने नंतर आपली आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याने 34 चेंडूत 60 धावा केल्या. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. जोस बटलरने कोणतीही चूक न करता त्याचा झेल घेतला. प्रभसिमरन सिंगचं आयपीएल कारकिर्दीतलं हे पहिलं अर्धशतक आहे.
Prabh ne balle balle karva ditti! ?
Sadde ?s power-hitting today was just ?#RRvPBKS #JazbaHaiPunjabi #SaddaPunjab pic.twitter.com/E0RJcm9io1
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 5, 2023
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम कुरान, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट प्लेयर्स – ऋषी धवन, अथर्व तायडे, हरप्रीत सिंग भाटिया, मॅथ्यू शॉर्ट, मोहित राठी
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेयर्स – ध्रुव जुरेल, आकाश वसिष्ठ, मुरुगन अश्विन, कुलदीप यादव, डोनाव्हॉन फरेरा