मुंबई : टीम इंडियाने (Team India) विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाची निवड समिती बरखास्त केली आहे. कारण निवड समितीने दोन वेळा विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली होती. परंतु खेळाडूंना चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळे बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. पुन्हा निवड समिती नेमण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामध्ये टीम इंडियाच्या अनेक माजी खेळाडूंची नावे पुढे आली आहेत.
मनिंदर सिंह, शिव सुंदर दास, सलिल अंकोला, समीर दिखे यांनी संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या निवड समितीमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाचे माजी खेळाडू सोमवारी सायंकाळपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. आतापर्यंत 50 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
सध्या टीम इंडियाचा माजी खेळाडू विनोद कांबळी हा बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेंशनवरती आपलं घर चालवत असल्याचं त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. बीसीसीआयकडून कांबळीला महिन्याला तीस हजार रुपये पेन्शन मिळते. त्यात तो कसाबसा घरं चालवतो.
टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याने कांबळीला एक काम दिलं होतं. कांबळीला मिडिलसेक्स ग्लोबल अॅकदमीचा मार्गदर्शक सचिननं केलं होतं. परंतु सकाळी पाच वाजता उठून कांबळीला मैदानात जावे लागत असल्यामुळे त्याने ती नोकरी सोडली होती. सध्या टीम इंडियाचा सिलेक्टर व्हायची कांबळीची इच्छा असल्यामुळे त्याने अर्ज केला आहे.