SA Vs Pak : दक्षिण आफ्रिका 14 वर्षानंतर जाणार पाकिस्तान दौऱ्यावर, जाणून घ्या, कसं असेल शेड्यूल?

| Updated on: Dec 09, 2020 | 8:31 PM

दक्षिण आफ्रिकेचा संघ तब्बल 14 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका पाकिस्तान दौऱ्यात 2 कसोटी सामने तसंच 3 टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळेल.

SA Vs Pak : दक्षिण आफ्रिका 14 वर्षानंतर जाणार पाकिस्तान दौऱ्यावर, जाणून घ्या, कसं असेल शेड्यूल?
Follow us on

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ तब्बल 14 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. (South Africa Tour of pakistan) पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका पाकिस्तान दौऱ्यात 2 कसोटी सामने तसंच 3 टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळेल. दक्षिण आफ्रिका तब्बल 14 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जात असल्याने दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (SA Vs Pak Sauth Africa Will Go Pakisatan tour next Year january February)

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेची सुरुवात 26 जानेवारीपासून होत आहे. 26 ते 30 जानेवारीदरम्यान कराची इंटरनॅशनल ग्राऊंडवर उभयतांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 4 ते 8 फेब्रुवारीदरम्यान रावळपिंडीच्या मैदानावर खेळवला जाईल.

11 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेला सुरुवात होणार आहे. 11 फेब्रुवारीला पहिला टी-ट्वेन्टी, 13 फेब्रुवारीला दुसरा टी-ट्वेन्टी सामना तर 14 फेब्रुवारीला मालिकेतील अखेरचा टी-ट्वेन्टी सामना खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या वेळी पाकिस्तान दौऱ्यावर 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 साली गेला होता.

दक्षिण आफ्रिकेने 2007 साली पाकिस्तान दौऱ्यात 2 कसोटी सामने खेळले होते. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 1-0 ने नमवलं होतं. 2007 नंतर दक्षिण आफ्रिकेने यूएईमध्ये पाकिस्तानशी कसोटी मालिका खेळल्या आहेत. 2010 आणि 2013 साली दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानशी यूएईमध्ये कसोटी मालिका खेळली आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका

26 जाने. ते 30 जाने- पहिला कसोटी सामना
04 फेब्रु. ते 08 फेब्रु- दुसरा कसोटी सामना

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान टी-ट्वेन्टी कसोटी मालिका

11 फेब्रु- पहिला टी-ट्वेन्टी सामना
13 फेब्रु-दुसरा टी-ट्वेन्टी सामना
14 फेब्रु-तिसरा टी-ट्वेन्टी सामना

(SA Vs Pak Sauth Africa Will Go Pakisatan tour next Year january February)

हे ही वाचा :

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण