मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या लहानपणीचा मित्र आणि माजी क्रिकेट पटू विनोद कांबळीला एक आव्हान दिलं. त्यासोबतच हे आव्हान पूर्ण करण्यासाठी सात दिवसांची मुदतही दिली. सचिनने विनोद कांबळीला सचिनच्या ‘क्रिकेटवाली बीट पे’ या गाण्यावर रॅप करण्याचं चॅलेन्ज दिलं. जर सात दिवसांनंतर म्हणजेच 28 जानेवारीला कांबळीने हे गाणं म्हटलं नाही, तर त्याने परिणामासाठी अशी ताकीदही सचिनने दिली (Cricket Wali Beat Pe Song).
सचिन तेंडुलकरने त्याच्या ट्वीटरवर याबाबतचा व्हिडीओ ट्वीट केला. हा व्हिडीओ ट्वीट करत सचिनने लिहिलं, “कांबळी मी तुला माझ्या #क्रिकेटवालीबिटपे या गाण्याचं रॅप करण्याचं आव्हान देतो. तुझ्याकडे एक आठवडा आहे.”
Mr. Kambli, I challenge you to do the rap of my song #CricketWaliBeat!
You have 1 week. ? @vinodkambli349 pic.twitter.com/8zU1tVG0mh— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 21, 2020
या व्हिडीओमध्ये सचिन आणि कांबळी हे दोघे क्रिकेटच्या मैदानावर असल्याचं दिसत आहेत. यावेळी सचिन कांबळीला त्याच्या गाण्याचं रॅप करण्याचं आव्हान देतो. सचिन म्हणतो, “क्रिकेट वाली बिट पे हे गाणं म्हणायचं आहे, पण त्यामधील रॅप हे त्यामधील नसून वेगळ असलं पाहिजे आणि तुला सर्व नावं पाठ असली पाहिजे. जर तु हे केलं तर तुला जे हवं ते देईन. यासाठी मी तुला एक आठवडा देतो. जर 28 जानेवारीला याला ते गाणं कसा म्हणायचं कळालं नाही, तर त्याला काहीतरी दुसरं करावं लागेल”. यावर कांबळी म्हणतो, ‘मोठं आव्हान आहे’.
आता कांबळी सचिनचं हे आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
पाहा व्हिडीओ :