मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात बॅटिंग करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शनिवारी पार पडलेल्या वर्ल्ड सेफ्टी सिरीजच्या (World Safety Series) इंडिया लिजेंड्स (india legends) विरुद्ध साऊथ आफ्रिका लिजेंड्स (South Africa legends) यांच्यातील सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केवळ 30 चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावलं. (Sachin tendulkar Hit Fifty in 30 Ball india legends Vs South Africa legends road Safety World Series)
सचिन तेंडुलकरने 37 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारांच्या सहाय्याने 60 रन्सची धमाकेदार खेळी केली. त्याचे अफलातून चौकार बघण्यासारखे होते. अगदी त्याने मारलेले फ्लिक, कव्हर ड्राईव्ह ‘सुप्पर से उप्पर’ होते. दुसऱ्या विकेटसाठी सचिन आणि एस. बद्रीनाथने 95 रन्सची पार्टनरशीप केली. दक्षिण आफ्रिकेच्या जोंडेकीने सचिनला आपलं शिकार बनवलं. तर 14 व्या ओव्हरमध्ये बद्रीनाथ 42 रन्सची खेळी करुन रिटायर्ड हर्ट झाला.
मास्टर ब्लास्टरने खेळलेल्या खेळीचा सोशल मीडियाला फिव्हर चढलाय. क्रिकेट रसिक आणि सचिनचे फॅन्स त्यांचं तोंडभरुन कौतुक करतायत. सचिनने पुन्हा एकदा जुन्या अंदाजात आक्रमक फलंदाजी केल्याने कॉमेंटेटरला देखील सचिनचं कौतुक करताना शब्द अपुरे पडले. देव कधीच रिटायर होत नसतो, इतक्या उच्च पराकोटीच्या शब्दात त्याने सचिनच्या यथार्थ खेळीचं सार्थ वर्णन केलं.
नाणेफेक गमावल्यानंतरही इंडिया लिजेंड्सला प्रथम बॅटिंग करण्याची संधी मिळाली. याच संधीचं सोनं करत सचिनने आतिषी खेळी केली. त्याने घातलेल्या पायावर युवराज सिंहने कळस चढवला.
सिक्सर किंग युवराजने देखील आपल्या आक्रमक अंदाजात बॅटिंग केली. युवराजने तर केवळ 21 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने एकाच ओव्हरमध्ये त्याने चार षटकार खेचले. युवराजने 21 चेंडूत 2ृ52 धावा ठोकल्या. मनप्रीत गोनी आणि युवराज सिंगमध्ये 63 रन्सची पार्टनरशीप झाली.
(Sachin tendulkar Hit Fifty in 30 Ball india legends Vs South Africa legends road Safety World Series)
हे ही वाचा :
Video : सेहवाग म्हणाला, ‘आमचा देव’, युवराज म्हणाला, ‘बब्बर शेर’, पाहा सचिन-सेहवागचा मजेशीर व्हिडीओ