चौकार-षटकार मारणाऱ्या बारकल्या पोरीवर क्रिकेटचा देवही फिदा, म्हणाला…

| Updated on: Feb 15, 2023 | 12:56 AM

सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. मुलीच्या बॅटींगवर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही फिदा झाला आहे.

चौकार-षटकार मारणाऱ्या बारकल्या पोरीवर क्रिकेटचा देवही फिदा, म्हणाला...
Follow us on

मुंबई : सोमवारी वुमन्स प्रीमिअर लीगच्या पहिल्या मोसमाचा लिलाव पार पडला. पुरूषांप्रमाणे आता महिलांची आयपीएलही होणार आहे. महिलांच्या आयपीएलमुळे आता नव्या खेळाडूंना आपला खेळ दाखवण्यासाठी एक स्टेज तयार झालं आहे. लिलाव होऊन एक दिवस पूर्ण झाला नाहीतर एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये 14 वर्षाची मुलगी मिस्टर 360 डिग्री स्टाईलने बॅटींग करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. व्हिडीओ पाहून नेटकरी लहान मुलीचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे. मुलीच्या बॅटींगवर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही फिदा झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलीचं नाव मूमल मेहर आहे. मूमल इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तिच्याकडे खेळण्यासाठी साधे बूट नाहीत आणि घराचं बांधकामही अर्धवट आहे. मूमलचा हा व्हिडीओ सचिनने ट्विट केला असून खास कॅप्शनही दिलं आहे.

 

सचिन तेंडुलकरनेही या मुलीच्या फलंदाजीचे कौतुक केले. मुमल मेहेरचा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, ‘लिलाव कालच झाला आणि आज सामनाही सुरू झाला?. खरंच बॅटींग पाहून आनंद झाला.

मुलीला क्रिकेटच चांगलं प्रशिक्षण देता येईल, इतकं या कुटुंबाचं उत्त्पन नाहीय. सध्या शाळेतील शिक्षक रोशन खान मूमलचे कोच आहेत. जे तिला क्रिकेटचे बारकावे शिकवतायत. रोशन खान दररोज तीन ते चार तास मूमलकडून क्रिकेटची प्रॅक्टिस करुन घेतात.

दरम्यान, क्रिकेट खेळण्याबरोबरच मूमलला घरच्या कामकाजात आईला मदत करावी लागते. ती बकऱ्या चरण्यासाठी घेऊन जाते. मात्र एवढ सगळं करुनही मूमलने तिची क्रिकेटची आवड जपलीय. मूमलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला टीम इंडियात घेण्याची मागणी होऊ शकते. तिला योग्य ट्रेनिंग मिळाल्यास मूमल लवकरच टीम इंडियात दिसू शकते.