मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) अनोख्या गोष्टींच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या सचिन तेंडूलकरची (Sachin Tendulkar) मैदानात धुवांधार खेळी पाहायला मिळाली. सचिननं वयाच्या 49 व्या वर्षी चांगली खेळी केल्याने चाहते खूष झाले आहेत. इतके जबरदस्त शॉट खेळले आहेत की, त्याचा व्हिडीओ (Viral Video) चाहत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
वर्ल्ड सेफ्टी सीरीजच्या 14 व्या सामन्यात तेंडूलकरकडून जबरदस्त खेळी झाली. 20 चेंडूत 40 धावा काढल्या. इंग्लंड लिजेंड बरोबर नुकतीच त्यांची मॅच झाली. चाहत्यांनी जुने खेळाडू खेळताना पाहून आनंद होत आहे. 3 चौकार आणि 3 षटकार मारले,
सामन्यात अचानक पाऊस सुरु झाल्याने काहीवेळ मॅच थांबवण्यात आली होती. त्याचबरोबर कालची मॅच 15 ओव्हरची खेळवण्यात आली. टीम इंडिया लिजेंडचा 40 धावांनी विजय झाला.
SRT Forever ❤️
.#SachinTendulkar #IndiaLegends #RvcjTelugu pic.twitter.com/QY9nXxyjQO— RVCJ Telugu (@rvcj_telugu) September 22, 2022
याच मॅच व्यतिरिक्त जगभरातील जेवढे खेळाडू हॉटेलमध्ये मस्ती करत आहेत. टीम इंडीयाच्या माजी खेळाडूंचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Just @sachin_rt things !! pic.twitter.com/BHwARvuuVs
— Sachinist (@Sachinist) September 22, 2022
सचिन तेंडूलकरचा परवा एक ऑम्लेट करीत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो चाहत्यांना आम्लेट कसं बनवतात हे सांगत होता. विशेष म्हणजे त्या व्हिडीओ ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ब्रेट ली याने देखील कमेंट केली होती. तो म्हणत होता, की उद्या मी नाष्टा करायला येतोय.
??????? ?.? ???? whattttt a playerrr ?@sachin_rt turning back the clock ?️?#RoadSafetyWorldSeries #sachintendulkar #sharjah #GOAT #God pic.twitter.com/DflUaugI4N
— Ashish Verma (@ashu112) September 22, 2022