India vs England 5Th T20i | इशान किशन आणि सूर्यकुमार टॉप क्लास खेळाडू, सचिन तेंडुलकरकडून कौतुक

| Updated on: Mar 20, 2021 | 4:54 PM

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशनचं (Ishan Kishan) कौतुक केलं आहे.

India vs England 5Th T20i | इशान किशन आणि सूर्यकुमार टॉप क्लास खेळाडू, सचिन तेंडुलकरकडून कौतुक
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशनचं (Ishan Kishan) कौतुक केलं आहे.
Follow us on

अहमदाबाद :सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) हे टॉप क्लास खेळाडू आहेत. मी सूर्यकुमारसोबत खूप वेळ घालवला आहे. तो अफलातून आहे. तसेच मी इशानला 2019 च्या आयपीएलमध्ये नेट्समध्ये सराव करताना पाहिलं होतं. तो स्विंग विरोधात खेळण्याचा प्रयत्न करतो. तो यात आता पारंगत झाला आहे. मी हे पाहून प्रभावित झालो आहे, असं म्हणत खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सूर्या आणि इशान किशनचं कौतुक केलं आहे. सचिनने एका रायटर्सला मुलाखत दिली. यादरम्यान त्याने या दोन्ही खेळाडूंचं कौतुक केलं. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. त्यामुळे सचिन आणि या दोघांचा जवळचा संबंध आहे. (Sachin Tendulkar praised Suryakumar Yadav and Ishan Kishan)

सूर्या आणि इशानची अफलातून कामगिरी

सूर्यकुमार आणि इशानने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यातून पदार्पण केलं. या पदार्पणातील सामन्यात इशानने चमकदार कामगिरी केली. आपल्या पदार्पणात त्याने अर्धशतक झळकावलं. इशान डेब्यु मॅचमध्ये अशी कामगिरी करणारा अजिंक्य रहाणेनंतर दुसराच भारतीय ठरला. मात्र या सामन्यात सूर्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तिसऱ्या सामन्यात सूर्याला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर पुन्हा चौथ्या सामन्यात सूर्याला संधी मिळाली.

सूर्याची जोरदार सुरुवात

सूर्याला चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा संधी मिळाली. या संधीचं सूर्याने सोनं केलं. सूर्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याचे चेंडूवर सिक्सर खेचला. सूर्या अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला. त्यानंतर त्याने अवघ्या 27 चेंडूत पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. सूर्याने या सामन्यात 57 धावांची खेळी केली. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या पहिल्या सामन्यात बॅटिंग करताना अर्धशतकी खेळी केली. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

5 व्या सामन्यात दोघांपैकी कोणाला संधी मिळणार?

मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. इंग्लंड विरुद्धची पाचवी टी 20 मॅच रंगतदार होणार आहे. त्यामुळे या सामन्यात उभय संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. सूर्यकुमारला संधी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातं आहे. तर इशानला संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाही, हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

केएलऐवजी इशानला संधी द्यावी : मायकल वॉर्न

दरम्यान या 5 व्या सामन्यात केएल राहुलऐवजी इशान किशनला रोहितसोबत खेळण्याची संधी देण्यात यावी, असं मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या :

पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारण्याची हिंमत कुठून आली, शार्दुलच्या प्रश्नावर सूर्यकुमार काय म्हणाला?

India vs England 5th T20i Preview | टीम इंडिया की इंग्लंड, मालिका कोण जिंकणार?

(Sachin Tendulkar praised Suryakumar Yadav and Ishan Kishan)