इंग्लंड : विश्वचषकातील हायव्होल्टेज क्रिकेट सामना अशी ओळख असलेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना आज (25 जून) रंगणार आहे. इंग्लंडच्या लॉर्डस मैदान हा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अर्जुन तेंडुलकर चक्क इंग्लंडच्या फलंदाजांसमोर वेगवान गोलंदाजी केली आहे.
ESPNcricinfo च्या अधिकृत ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अर्जुनने भगव्या रंगाची टी शर्ट घातली आहे. यात तो इंग्लंडच्या फलंदाजांसमोर वेगवान गोलंदाजी करत आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यासाठी सराव करत असताना अर्जुन इंग्लंडच्या फलंदाजांना गोलंदाजीचे प्रदर्शन करत होता. “वर्ल्ड कप 2019, ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी खुद्द तेंडुलकर इंग्लंडला मदत करत आहे,” असे कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आले आहे.
अर्जुनचा हा व्हिडीओ आतापर्यंत 60 हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तसंच या व्हिडीओला 2 हजार लाईक्स केलं असून 329 जणांनी री ट्विट केलं आहे.
England have had a Tendulkar helping them out ahead of #ENGvAUS at Lord’s! #CWC19 pic.twitter.com/Yl8OmN8p46
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 24, 2019
अर्जुन तेंडूलकर हा सध्या भारताच्या अंडर 19 संघासाठी खेळला आहे. अर्जुन हा वेगवान गोलंदाज असून तो सध्या इंग्लिश काऊंटी सेकंड डिवीजनमध्ये खेळत आहे. दरम्यान विश्वचषकात श्रीलंकेसोबत हरल्यानंतर आता इंग्लंडला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी तीन सामन्यांमधील दोन सामने जिंकावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
छातीत दुखत असल्याने ब्रायन लारा मुंबईतील रुग्णालयात दाखल
World Cup 2019 : 10 दिवसात 4 सामने, आता खरा भारतीय संघाचा कस!