मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Master Blaster Sachin Tendulkar) ट्रेडमार्क शॉट म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह…. ज्या शॉटसाठी क्रिकेट रसिक आणि सचिनने चाहते हजारो रुपयांचं तिकीट काढून जायचे. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून चाहत्यांना त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला नव्हता. मात्र रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या (road Safety World Series) शनिवारी झालेल्या सामन्यात मास्टर ब्लास्टरने एक सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह मारुन चाहत्यांना अनेक वर्ष पाठीमागे नेलं. (Sachin tendulkar Straight Drive India legends Vs South Africa legends)
There are few things never change.. #SRT’s straight drive is that one of few thing. Absolutely #nostalgia watching #SachinTendulkar and #YuvrajSingh bat like they used to bat #RoadSafetyWorldSeries2021 pic.twitter.com/U2jreLQx5Y
— Aditya Kulkarni (@imadityak) March 13, 2021
वर्ल्ड सेफ्टी सिरीजच्या (World Safety Series) इंडिया लिजेंड्स (india legends) विरुद्ध साऊथ आफ्रिका लिजेंड्स (South Africa legends) यांच्यातील सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केवळ 30 चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावलं. सचिन तेंडुलकरने 37 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारांच्या सहाय्याने 60 रन्सची धमाकेदार खेळी केली. त्याचे अफलातून चौकार बघण्यासारखे होते. अगदी त्याने मारलेले फ्लिक, कव्हर ड्राईव्ह ‘सुप्पर से उप्पर’ होते. त्यातही सचिनने मारलेला अफलातून स्ट्रेट ड्राईव्ह… अचूक हेड पोझिशन.. बॉलवर शेवटपर्यंत असलेलं चित्त… अशा कित्येक गोष्टी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरुन सर्रकन निघून गेल्या.
पाहा व्हिडीओ :
Best Straight Drive ..
?#RoadSafetyWorldSeries#SachinTendulkar pic.twitter.com/aUsQUnmpnA— Sunil Kumar ?? (@sunil_k26) March 13, 2021
इंडिया लिजंड्सकडून सलामीला सेहवाग आणि सचिन मैदानात उतरले. मात्र एक चुकीचा फटका मारताना सेहवागला आऊट व्हावं लागलं. 6 धावा करुन तो तंबूत परतला. नंतर दुसऱ्या विकेटसाठी सचिन आणि एस. बद्रीनाथने 95 रन्सची पार्टनरशीप केली. दक्षिण आफ्रिकेच्या जोंडेकीने सचिनला आपलं शिकार बनवलं. तर 14 व्या ओव्हरमध्ये बद्रीनाथ 42 रन्सची खेळी करुन रिटायर्ड हर्ट झाला.
What an Inning by @sachin_rt at age of 47 ??#RoadSafetyWorldSeries#SachinTendulkar pic.twitter.com/NemVbl4XY8
— ?????? (@Shebas_10dulkar) March 13, 2021
मास्टर ब्लास्टरने खेळलेल्या खेळीचा सोशल मीडियाला फिव्हर चढलाय. क्रिकेट रसिक आणि सचिनचे फॅन्स त्यांचं तोंडभरुन कौतुक करतायत. सचिनने पुन्हा एकदा जुन्या अंदाजात आक्रमक फलंदाजी केल्याने कॉमेंटेटरला देखील सचिनचं कौतुक करताना शब्द अपुरे पडले. देव कधीच रिटायर होत नसतो, इतक्या उच्च पराकोटीच्या शब्दात त्याने सचिनच्या यथार्थ खेळीचं सार्थ वर्णन केलं.
नाणेफेक गमावल्यानंतरही इंडिया लिजेंड्सला प्रथम बॅटिंग करण्याची संधी मिळाली. याच संधीचं सोनं करत सचिनने आतिषी खेळी केली. त्याने घातलेल्या पायावर युवराज सिंहने कळस चढवला.
सिक्सर किंग युवराजने देखील आपल्या आक्रमक अंदाजात बॅटिंग केली. युवराजने तर केवळ 21 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने एकाच ओव्हरमध्ये त्याने चार षटकार खेचले. युवराजने 21 चेंडूत 2ृ52 धावा ठोकल्या. मनप्रीत गोनी आणि युवराज सिंगमध्ये 63 रन्सची पार्टनरशीप झाली.
हे ही वाचा :
देव कधी रिटायर होत नाही, सचिनचा धमाका, 30 चेंडूत तुफानी अर्धशतक!