सचिन तेंडुलकरची BMW X5M विकत घ्यायचीय? नाशिकच्या मालकाकडून विक्रीला, किंमत अवघी…

| Updated on: Mar 23, 2021 | 8:34 AM

सचिनने आपली बीएमडब्ल्यू कार काही वर्षांपूर्वी विकली होती. यूज्ड कार मार्केटमध्ये ही कार पुन्हा विक्रीला आल्याची माहिती आहे (Sachin Tendulkar's BMW X5M Cars )

सचिन तेंडुलकरची BMW X5M विकत घ्यायचीय? नाशिकच्या मालकाकडून विक्रीला, किंमत अवघी...
सचिन तेंडुलकर आणि बीएमडब्ल्यू कार
Follow us on

मुंबई : सेलिब्रिटींना वापरलेल्या वस्तू, कपडे किंवा त्यांच्या गाड्या विकत घेण्याचा शौक अनेक चाहत्यांना असतो. त्यामुळेच सेलिब्रिटींकडून केल्या जाणाऱ्या लिलावाकडे अनेकांचे डोळे लागून राहिले असतात. हा सेलिब्रिटी जर मास्टरब्लास्टर विक्रमादित्य सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) असेल तर? आणि सचिनने चालवलेली जुनी कार तुम्हाला पंधरा लाखात मिळत असेल तर? (Sachin Tendulkar’s Iconic BMW X5M back is sale in used Cars Market)

सचिनची BMW X5M पुन्हा विक्रीला

सचिन तेंडुलकर क्रिकेटबद्दल जितका पॅशनेट आहे, तितकाच लक्झरी कार्सबबातही. सचिन आणि BMW Cars हे समीकरण सर्वश्रुत आहे. सचिन बीएमडब्ल्यूचा ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडरही राहिला आहे. बीएमडब्ल्यू ही आलिशान गाड्यांच्या यादीत आपली पहिली पसंती असल्याचं त्याने अनेक वेळा सांगितलंही आहे. सचिनच्या ताफ्यात 2002 मध्ये जेव्हा BMW X5M दाखल झाली, तेव्हा अनेकांच्या माना उंचावल्या होत्या. गाडीचा लगून बीच ब्ल्यू (Lagoon Bleach Blue) रंग कायमच लक्षवेधी ठरला होता.

ओएलएक्सवर विक्रीसाठी उपलब्ध

नव्या गाड्यांना जागा करुन देण्यासाठी सचिनने आपली बीएमडब्ल्यू कार काही वर्षांपूर्वी विकली होती. यूज्ड कार मार्केटमध्ये सचिनची कार पुन्हा विक्रीला आल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये वाचायला मिळत आहे. cartoq.com या वेबसाईटच्या माहितीनुसार ही जुनी बीएमडब्ल्यू गाडी पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही BMW X5M खासकरुन सचिनसाठी तयार करण्यात आली होती. परंतु आता ही गाडी ओएलएक्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. नव्या मालकाशी संपर्क साधून तुम्ही अधिक तपशील किंवा किमतीसाठी घासाघीसही करु शकता.

15 लाख रुपयांना विक्रीला

सचिनच्या विंटेज कारला नव्या मालकानेही उत्तम स्थितीत ठेवल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे कारच्या बॉडीवर कोणताही डेंट किंवा स्क्रॅच आलेला नाही. सध्या ही कार नाशिकमध्ये असल्याची माहिती आहे. कारच्या ओडोमीटरनुसार 89,000 किलोमीटरचं रनिंग पूर्ण झालेलं आहे. ही कार 15 लाख रुपयांना विक्रीस ठेवल्याची माहिती आहे. म्हणजेच नवी कोरी ह्युंडाई क्रेटा (Hyundai Creta) किंवा किया सेल्टोस (Kia Seltos) च्या किमतीत तुम्ही सचिनची जुनी बीएमडब्ल्यू विकत घेऊ शकाल.

सचिनला आलिशान गाड्यांचा शौक

सर्वाधिक कसोटी शतकं पूर्ण केल्याबद्दल फियाट इंडियाने सचिन तेंडुलकरला फरारी 360 मॉडेना (Ferrari 360 Modena) भेट दिली होती. याशिवाय BMW M6 Gran Coupe, BMW 750 Li, BMW M5 30 Jahre एडिशन, BMW i8, Audi Q7, Mercedes Benz C36 AMG आणि Nissan GT-R अशा आलिशान गाड्या सचिनने वेळोवेळी वापरल्या आहेत. (Sachin Tendulkar’s Iconic BMW X5M back is sale in used Cars Market)

 

संबंधित बातम्या :

विराट कोहलीने वापरलेली आलिशान ऑडी बे’कार’ अवस्थेत

सेकंड हँड कार का घेऊ नये? जाणून घ्या 5 प्रमुख कारणं

(Sachin Tendulkar’s Iconic BMW X5M back is sale in used Cars Market)