लंडंन/मुंबई : भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा ही सध्या इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. ती सध्या इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात मुलगा इजहान आणि बहीण अनमसोबत विश्चचषक सामन्यांचा आनंद लुटत आहे. सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक हा यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात खेळतो आहे. यावेळी विश्वचषक इंग्लंडमध्ये होतो आहे. त्यामुळे सानिया कुटुंबासह विश्वचषक पाहायला इंग्लंडमध्ये पोहोचली आहे.
येत्या 16 जूनला म्हणजेच उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. सानिया हा सामना पाहाण्यासाठी मैदानात उपस्थित राहाणार आहे. आता सानिया भारताला सपोर्ट करणार की, पाकिस्तानला हे पाहाणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे.
सानियाने नुकतंच तिच्या इंग्लंडवारीचे काही फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केले. यामध्ये सानिया इजहानसोबत दिसत आहे. फोटोमध्ये सानिया तिच्या मुलाला किस करताना दिसते आहे. सानियाने तिच्या मुलासोबतच्या या फोटोला ‘Moments’ असं कॅप्शन दिलं आहे. दुसऱ्या फोटोमध्ये सानियाने ओव्हरसाईज टर्टल नेक स्वेटर घातलं आहे. त्यासोबत तिने ब्लॅक डेनिम आणि ब्लॅक बेल्टही घातला आहे. सानियाची बहीण अनमनेही तिच्या इन्स्टाग्रामवर सानियाचे काही फोटो शेअर केले आहेत.
सानिया 2020 मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक्समधून पुन्हा एकदा टेनिस विश्वात वापसी करणार आहे. त्यासाठी ती खूप मेहनत करते आहे.
भारत पाकिस्तान सामना
उद्या म्हणजेच 16 जूनला इंग्लंडच्या मँचेस्टर मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार आहे. विश्वचषकातील या सामन्याची भारत तसेच पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींना खूप उत्सुकता आहे. क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच चर्चा जगभरात सुरु आहे. विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकातील आपला विक्रम कायम ठेवणार की सरफराज अहमदची पाकिस्तानी टीम बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारताचा हा चौथा तर पाकिस्तानचा हा पाचवा सामना असणार आहे.
भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना 13 जूनला पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर आता भारत पाकिस्तानशी मुकाबला करण्यास सज्ज आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानने विश्वचषकात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात पाकिस्तान विजय मिळवू शकला. तर दोन सामन्यांत पाकिस्तानचा पराभव झाला आणि एक सामना रद्द झाला.
संबंधित बातम्या :
भारत-पाक सामना, एका तिकिटाची किंमत तब्बल 60 हजारांच्याही पुढे
World Cup : पावसामुळे क्रिकेट मॅच रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का?
जबरा पाकिस्तानी फॅन, ज्याला धोनी 8 वर्षांपासून तिकीट पाठवतो!
India vs Pakistan : मोहम्मद आमीरवर हल्ला चढवा, सचिनचा विराट-रोहितला सल्ला