मुंबई : पाकिस्तान टीमचा फलंदाज शोएब मलिक (Shoib Malik)आणि सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्या घटस्फोटाच्या अनेक बातम्या मीडियात चालल्या. परंतु दोघांनी कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. त्यावेळी दोघं खरंच घटस्फोट घेणार आहेत अशी बातमी पाकिस्तान मीडियाने (pakistan media) चालवली होती. त्याचबरोबर पाकिस्तानमधील एका अभिनेत्रीमुळं दोघ विभक्त होत असल्याची सुद्धा सोशल मीडियावर चर्चा होती.
आठवडाभर दोघं विभक्त होणार असल्याची बातमी मीडियात चालल्यानंतर शोएब मलिक सानिया मिर्झाने एक युट्यूबला शो सुरु करणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली. त्यावेळी दोघांच्या घटस्फोटाची बातमी थांबली. त्यानंतर सुद्धा शोएब मलिक सानिया मिर्झाने घटस्फोटवरती एकदाही विधान केलं नव्हतं.
ज्यावेळी दोघांना एका शोमध्ये प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तो आमची आयुष्याशी एक छोटीशी गोष्टी होती. त्यामध्ये मीडीयाने खोलवर जायला नको होतं असं विधान शोएब मलिकने केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी घटस्फोट या विषयावर बोलणं टाळलं. त्यामुळे पुन्हा सोशल मीडियावर दोघांची चर्चा आहे.