नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानमधून भारतात परतले. बॉलिवूड, क्रीडा ते राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांनी अभिनंदनचं स्वागत केलं. तर दुसरीकडे टेनिस स्टार सानिया मिर्झानेही अभिनंदनचं स्वागत केलं. “विंग कमांडर अभिनंदन तुमचं स्वागत आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने आमचे हिरो आहात. तुम्ही जे शौर्य दाखवलंय, त्यासाठी देशाचा तुम्हाला सलाम. जय हिंद.” असं ट्वीट सानियाने केलं.
Welcome back Wing Commander Abhinandan .. you are our HERO in the truest sense.. The country salutes you and the bravery and dignity you have shown ?? #Respect #WelcomeBackAbinandan Jai Hind
— Sania Mirza (@MirzaSania) March 1, 2019
सानिया मिर्झाच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर तिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकवर निशाणा साधण्यात आला. अभिनंदन यांना पकडल्यानंतर शोएब मलिकने जे ट्वीट केलं होतं, त्याला सानियाने दिलेलं हे एक प्रकारे उत्तरच होतं. विंग कमांडर अभिनंदन यांना अटक केल्यानंतर शोएब मलिकने पाकिस्तानी वायूसेनेचं कौतुक केलं होतं. पाकिस्तान जिंदाबाद असं ट्वीट त्याने केलं.
Hamara #PakistanZindabad ????
— Shoaib Malik ?? (@realshoaibmalik) February 27, 2019
शोएब मलिकने जेव्हा हे ट्वीट केलं, तेव्हा यावर सानियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. सानियाची प्रतिक्रिया न आल्याने तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात आली. सानियाचा पती पाकिस्तानी असल्यामुळे ती शांत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. पण विंग कमांडर अभिनंदन यांच्या वापसीनंतर सानिया मिर्झानेही त्यांचं जय हिंद म्हणत स्वागत केलं. त्यामुळे सानियाचं कौतुक करण्यात आलं आणि तिने तिच्या पतीलाच हे उत्तर दिलंय असा तर्कही लावण्यात आला.