संजू सॅमसन वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार नाही? रोहित शर्मा याच्या वक्तव्याने क्रीडाप्रेमींमध्ये रंगली चर्चा

| Updated on: Jul 27, 2023 | 9:27 PM

वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. तसेच वेस्ट इंडिजला गोलंदाजांनी कमी धावांवर रोखलं आहे. असं असताना रोहित शर्माच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

संजू सॅमसन वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार नाही? रोहित शर्मा याच्या वक्तव्याने क्रीडाप्रेमींमध्ये रंगली चर्चा
संजू सॅमसन वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नसणार? रोहित शर्मा याने सांगितलं असं काही की...
Follow us on

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पहिला वनडे सामना सुरु आहे. वनडे वर्ल्डकपसाठी ही पूर्वतयारी असल्याचं बोललं जात आहे. कर्णधार रोहित शर्मा यानेही ही बाब अधोरेखित केलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत रोहित शर्मा याने गोलंदाजी घेतली. तसेच प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असेल याबाबत सांगितलं. प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसन याचं नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. संजू सॅमसन ऐवजी संघात इशान किशनला स्थान देण्यात आलं आहे. शेवटच्या कसोटी सामन्यात इशान किशनने जलद अर्धशतक झळकावलं होतं. त्या पार्श्वभूमीवर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं असावं असं बोललं जात आहे. पण प्लेइंग इलेव्हनबाबत बोलताना रोहित शर्माने वर्ल्डकपबाबत बरंच काही बोलून गेला. त्यामुळे संजू सॅमसन वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही या बाबत चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर रोहित शर्मा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. “या सामन्यात आम्ही क्षेत्ररक्षण करू. यामागे तसं काही कारण नाही. पण आम्ही काही वेगळ्या गोष्टी करू इच्छित आहोत. आम्ही एक टीम म्हणून नेमकं कुठे आहोत याचा अंदाज घ्यायचा आहे.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं.

वर्ल्डकपबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?

“आम्ही वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून मैदानात उतरणार आहोत. त्यासाठी सामन्याचा निकाल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही अनेकदा वेगवेगळ्या खेळाडूंची परीक्षण करतो तेव्हा आपल्याला निकालाचं आकलन होत नाही. जगभरात सर्व क्रिकेटर सर्व प्रकारच्या फॉर्मेटमध्ये खेळत आहेत. त्यामुळे स्थिती समजून घेणं गरजेचं आहे. आशा आहे आम्ही इथे त्याबाबत आकलन करू शकू.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं.

खेळाडूंचं आकलन करणं महत्त्वाचं असताना दुसरीकडे रोहित शर्मा याने संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून दूर ठेवलं आहे. त्यामुळे संजू सॅमसनला वर्ल्डकपमध्ये संधी मिळणार नाही, असा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे. आता नेमकं असं होतं की संधी मिळते हे येणारी वेळ सांगू शकेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.