कोहली जडेजासोबत वर्ल्डकप जिंकला, मुंबईकडून सर्वाधिक सिक्सर, ‘डावखुरा धोनी’ म्हणून ओळख पण 3 मॅचमध्ये करिअर संपलं…

| Updated on: Mar 24, 2021 | 10:10 AM

तीन एकदिवसीय सामन्यांनंतर गेल्या 11 वर्षांत सौरभ तिवारी पुन्हा भारतीय संघात खेळू शकला नाही. अशा प्रकारे, त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दोन डावांमध्ये 49 धावांवरच थांबली. | Saurabh Tiwari

कोहली जडेजासोबत वर्ल्डकप जिंकला, मुंबईकडून सर्वाधिक सिक्सर, डावखुरा धोनी म्हणून ओळख पण 3 मॅचमध्ये करिअर संपलं...
Saurabh Tiwari
Follow us on

मुंबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात 2008 मध्ये भारताने 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या संघाचे बरेच खेळाडू नंतर भारतीय क्रिकेट संघाचा भाग झाले. यामध्ये विराट कोहली, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), मनीष पांडे (Manish Pandey) अशा नावांचा समावेश होता. पण असेही एक नाव होते ज्यात अपार क्षमता होती. आक्रमक फलंदाजी ही त्याची ओळख होती. महेंद्रसिंग धोनीप्रमाणेच (MS Dhoni) तोदेखील झारखंडहून आला आणि वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्याने टीम इंडियाकडूनही पदार्पण केले. झारखंडचा तो दुसरा क्रिकेटपटू होता. त्याने आयपीएलमध्येही जबरदस्त सुरुवात केली, पण नंतर फॉर्ममध्ये अशी घसरण झाली की आयपीएलमध्येही त्याचे रन्स कमी होऊ लागले, अन् नंतर तर टीम इंडियाचं स्वप्नही मागे राहिलं. ही लढवय्या सौरभ तिवारीची (Saurabh Tiwari) कहाणी आहे… (Saurabh tiwary cricket career Who Called left handed Dhoni)

सौरवचं क्रिकेट पदार्पण

डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीने वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर झारखंडकडून तो अंडर -14 लेव्हलला खेळला आणि वयाच्या 17 व्या वर्षी त्याने प्रथम श्रेणीमध्ये प्रवेश केला. नंतर 2008 मध्ये त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वात मलेशियामध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक खेळला. या स्पर्धेत त्याने 06 सामने खेळले आणि 115 धावा केल्या. भारत या स्पर्धेचा विजेता बनला. याच विजेत्या संघाचा सौरभ तिवारी सदस्य होता. या संघात त्याच्यासोबत असलेले विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मनीष पांडे यांना पुढे आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. जडेजाने अगदी पहिल्या हंगामातच स्वत: ला सिद्ध केले आणि शेन वॉर्न सारख्या दिग्गजांनी त्याला रॉकस्टार म्हटलं. तर मनीष पांडेने दुसर्‍या हंगामात शतक झळकावून स्वत:ला सिद्ध केलं. विराट कोहलीही आरसीबीच भाग झाला होता.

आयपीएल 2010 च्या स्पर्धेत मुंबईकडून खेळताना सौरभने दाखवली प्रतिभेची चुणूक

सौरभ तिवारी आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2010 मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवली. आपल्या प्रतिभेचा परिचय करुन देताना त्याने अनेक मॅचविनिंग नॉक खेळले.. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सकडून त्याने 16 सामने खेळले आणि 136 च्या स्ट्राइक रेटने 419 धावा केल्या. यामुळे तो त्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजांच्या यादीत सामील झाला. सौरभ तिवारीने या हंगामात 18 खणखणीत षटकार ठोकले, जे मुंबईकडून सर्वाधिक षटकार होते. याच काळात त्याला डावखुरा महेंद्रसिंग धोनी म्हटलं गेलं. तसंच 2009 च्या रणजी करंडक स्पर्धेत त्याने पाच सामन्यात तीन शतके ठोकली होती. यावेळी, त्याची सरासरी 98 होती. या खेळामुळे त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली.

त्यानंतर भारताचा कर्णधार धोनीनेही त्याचे कौतुक केले. त्याच्याकडून बर्‍याच अपेक्षा वाढल्या होत्या. असं म्हटलं होतं की जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर सौरभ तिवारी बराच पुढे जाऊ शकतो. २०१० च्या एशिया कपसाठी सौरभ तिवारी युवराज सिंगच्या जागी प्रथम टीम इंडियामध्ये आला होता. परंतु त्याला खेळायची संधी मिळाली नाही.

3 मॅच, 2 वेळा बॅटिंग, एकही वेळ आऊट नाही, इंटरनॅशनल करिअर संपलं!

ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. पहिल्या डावात नाबाद 12 धावा काढल्या. दुसरा सामना डिसेंबर 2010 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला गेला. यात युसुफ पठाणच्या धमाकेदार बॅटिंगने भारताला विजय मिळाला. विजयात युसूफ पठाणने मोठे योगदान दिलं. पण तिवारीने नाबाद 37 धावा केल्या. ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

यानंतर तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तीन एकदिवसीय सामन्यांनंतर गेल्या 11 वर्षांत सौरभ तिवारी पुन्हा भारतीय संघात खेळू शकला नाही. अशा प्रकारे, त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दोन डावांमध्ये 49 धावांवरच थांबली.

हे ही वाचा :

17 वर्षीय शेफाली वर्माचा धमाका, केवळ 12 चेंडूत 58 धावा, चौकार षटकारांची बरसात!

शिखर धवनने सांगितला टीमबाहेर राहण्याचा अनुभव, म्हणतो, ‘पाणी घेऊन जाण्याचा माझा विचार होता पण…’