कार्डिफ, इंग्लंड : विश्वचषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 95 धावांनी पराभव केला. के एल राहुल आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर भारताने हा सोपा विजय मिळवला. या सामन्यात धोनीने केवळ 78 चेंडूत घणाघाती 113 धावा ठोकल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 50 षटकात 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं. हे आव्हान बांगलादेशला पेलवलं नाही. बांगलादेशचा डाव 49.3 षटकात 264 धावांत आटोपला.
धोनी यष्टीरक्षण करताना असो किंवा फलंदाजी करताना, त्याच्या कर्णधार नेहमीच जागा असतो. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीतला वेगळाच गुण पाहायला मिळाला. धोनी फलंदाज करत असताना त्याने चक्क बांगलादेशचीही फिल्डिंग लावण्यास मदत केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
सराव सामन्यातील 40 व्या षटकात शब्बीर गोलंदाजी करत होता. 60 धावांवर असलेल्या धोनीने शब्बीरला थांबवलं आणि सूचना केली. शब्बीरने रनअप घेतला, पण चेंडू फेकण्यापूर्वीच त्याला थांबावं लागलं. धोनी स्टम्पच्या बाजूला झाला आणि एका खेळाडूला योग्य जागी लावण्याची सूचना गोलंदाजाला केली. धोनीने बांगलादेशच्या फिल्डरला मिड विकेट स्क्वेअर लेगला जाण्यासाठी सांगितलं. हे अभूतपूर्व चित्र पाहून समालोचकांनाही हसू आवरलं नाही. शिवाय शब्बीरनेही धोनीचे आभार मानले.
VIDEO :
In yesterday's warm-up match, Dhoni stopped bowler Sabbir Rahman and advised him to move his fielder from wid-wicket to square leg in the 40th over. The bowler agreed.
That's the level of involvement he brings to his game.#Captain pic.twitter.com/V0Uup1fHLH— Abhishek Murarka ?? (@abhymurarka) May 29, 2019