काहीवेळेला एखाद्या खेळाडूकडून (Player) गडबडीत अशी काही कृती होऊन जाते की चाहत्यांना हसू आवरत नाही. कारण आत्तापर्यंत अनेकदा मैदानात अशी खेळी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेकदा हास्यास्पद कृती ही क्रिकेटच्या मैदानात (Cricket Ground) पाहायला मिळते. क्रिकेट मैदानावर एका महिला खेळाडूकडून चुकीची फिल्डींग (Funny Cricket Video) झाली आहे. त्यामुळे त्याचा व्हिड़ीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
सद्या बांग्लादेशमध्ये आशिया चषक सुरु आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत अनेक टीमकडून चांगली कामगिरी झाली आहे. काल थायलंड आणि मलेशिया यांच्यात एक मॅच झाली. त्या मॅचमधला हा व्हिडीओ आहे.
Best fielding effort ever ??pic.twitter.com/x9PwDoGQzW
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) October 10, 2022
ज्यावेळी थायलंडच्या महिला खेळाडूने जोराचा चेंडू मारला. त्यावेळी मलेशियाच्या महिला खेळाडूने त्यांना तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा गडबडीने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूकडे फेकला गेला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल झाला असून त्यावर अनेकजण कमेंट करीत आहेत.