मेलबर्न : पाकिस्तान टीमचा (Pakistan Team) पराभव झाल्यापासून खेळाडूंसह निवड समितीवरती अनेकांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून टीका केली आहे. कारण विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) अत्यंत महत्त्वाची आहे. तिथं झिम्बाब्वे सारख्या टीमने पाकिस्तानला पराभूत केल्याने चाहत्यांच्या अधिक जिव्हारी लागले आहे. पाकिस्तान टीम सेमीफायनलपर्यंत पोहचणार का ? असा अनेक क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
टीम इंडियाकडून सुद्धा पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर वसीम अक्रम, शोएब अख्तर या पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी सडकून टीका केली होती. मॅचमध्ये चुका केल्यामुळे आणि निर्णय चुकल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं दोघांचं म्हणणं होतं.
पाकिस्तानच्या टीमने टॉस जिंकल्यानंतर झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी चांगली खेळी करीत 130 धावांपर्यंत मजल माजली होती. पण पाकिस्तान एकहाती मॅच जिंकेल असं चाहत्यांना वाटतं होतं. परंतु झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करीत मॅचवरती कब्जा मिळविला.
ज्यावेळी पाकिस्तान टीमला शेवटच्या चेंडूवर तीन धावा पाहिजे होत्या. त्यावेळी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांने अप्रतिम चेंडू टाकला. त्यावर एक धाव काढली. दुसरी धाव काढत असताना पाकिस्तानचा खेळाडू धावचित झाला आणि झिम्बाब्वे टीम विजयी झाली.
पॉमी हा झिम्बाब्वे टीमचा माजी खेळाडू आहे. तो त्यावेळी कॉमेट्री करीत होता. ऐतिहासिक विजय पाहून पॉमी याचा स्वतःवर विश्वास बसेना अशी स्थिती होती. तो कॉमेट्री रुममध्येचं मोठ्याने ओरडू लागला.