मेलबर्न : विश्वचषक स्पर्धेतील (T20 World cup 2022) आज एक महत्त्वाचा दिवस मुकाबला थोड्यावेळात सुरु होणार आहे. न्यूझिलंड (NZ) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सेमीफायनलमधील पहिली मॅच होणार आहे. आजच्या मॅचमध्ये जी टीम विजयी होईल, ती अंतिम सामना खेळेल. पाकिस्तानचा गोलंदाज हरिस रौफ (Haris Rauf) यांचा काल वाढदिवस होता. त्याला चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
काल ज्यावेळी हरिस रौफ यांच्या वाढदिवसासाठी केकं आणला होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी पाकिस्तान टीममधील सगळे सदस्य तिथं उपस्थित होते. त्यावेळी शादाब आणि शाहीनने तिथं हरिस रौफची मस्करी केली. त्यानंतर हरिस रौफने रडण्याचं नाटक केल्याचं व्हिडीओ दिसत आहे. त्यानंतर हरिस रौफने गॉगल घालून केक कापला आहे.
आजच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीम कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण आतापर्यंत पाकिस्तान टीमचा प्रवास एकदम खडतर राहिला आहे. तसेच न्यूझिलंड टीमने आतापर्यंत चांगली कामगिरी केली.
पाकिस्तानची प्लेइंग इलेवन- मोहम्मद रिजवान, बाबर आजम, मोहम्मद हारिस, शान मसूद, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
न्यूजीलंडची प्लेइंग इलेवन- फिन एलेन, डेवन कॉन्वे, केन विलियमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, इश सोढ़ी, लॉकी फर्गुसन, ट्रेंट बोल्ट