मुंबई : टीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) स्थान देण्यात आलेलं नाही. हार्दिक गोलंदाजी टाकण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याचा समावेश करण्यात आला नाही. पाठीतील दुखापतीमुळे हार्दिकला गोलंदाजी करताना समस्या उद्भवतात. पंड्या गोलंदाजी करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं बीसीसीआयनेही स्पष्ट केलं. “चांगल्या खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी ही निवड समितीची असते. मात्र (Shardul Thakur) शार्दुल ठाकूरने ऑलराऊंडर म्हणून आपली दावेदारी सिद्ध केली आहे”, असं टीम इंडियाचे फिल्डिंग कोच (Bharat Arun) भरत अरुण म्हणाले. ते पीटीआयसोबत बोलत होते. (shardul thakur proved he become good all rounder says team india Bowling coach bharat arun)
“खेळाडूंना संधी द्यायची की नाही ही जबाबदारी पूर्णपणे निवड समितीची असते. निवड समितीने निवडलेल्या खेळाडूंवर आम्ही मेहनत घेतो. त्या खेळाडूला अष्टपैलू म्हणून घडवतो. शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जे काही केलं ते शानदार होतं”, असं म्हणत अरुण यांनी शार्दुलचं कौतुक केलं. हार्दिक टीम इंडियाकडून 2018 मध्ये अखेरची कसोटी खेळला होता. हार्दिकने ही अखेरची कसोटी इंग्लंड दौऱ्यावर खेळला होता. हार्दिकला 2019 पासून पाठीच्या दुखापतीने ग्रासलं आहे. हार्दिकला 2019 मध्ये आयपीएलदरम्यान खांद्याला दुखापत झाली होती.
“आम्ही हार्दिकसारखे गोलंदाज घडवू, अशी मी आशा व्यक्त करतो. हार्दिक एक अद्भूत प्रतिभावान खेळाडू आहे. हार्दिकला पाठीच्या दुखापतीमुळे ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशननंतर त्यातून सावरणं आव्हानात्मक असतं. त्याने इंग्लंड विरुद्ध गोलंदाजी केली होती. हार्दिकने चांगली कामगिरी केली. हार्दिकने अशी कामगिरी करावी, अशी आमची अपेक्षा आहे. हार्दिककडून अशाच कामगिरीसाठी त्याच्यावर लक्ष द्यायला हवं. त्यामुळे आम्हाला सीम ऑलराऊंडरची आवश्यकता आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असे खेळाडू असायला हवेत”, असंही अरुण यांनी स्पष्ट केलं.
शार्दुलने आतापर्यंत 2 कसोटींमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. शार्दुलला कसोटी पदार्पणात दुखापतीमुळे पहिल्याच ओव्हरमध्ये मैदानााबाहेर बसावे लागले होते. त्यानंतर काही वर्षांनी शार्दुलला संधी मिळाली. शार्दुलने या संधींच सोनं केल. शार्दुलने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत बोलिंगसह बॅटिंगनेही धमाका केला होता. शार्दुलने या मॅचमध्ये 7 विकेट्ससह अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे शार्दुलला इंगलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
संबंधित बातम्या :
(shardul thakur proved he become good all rounder says team india Bowling coach bharat arun)