व्हॅलेंटाईन डे पूर्वी शिखर धवनला आली पत्नीची आठवण! Video तून सांगितली मोठी गोष्ट

| Updated on: Feb 12, 2023 | 9:49 PM

शिखर धवनचा इन्स्टाग्रामवरील एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहेत. या व्हिडीओत त्याला व्हॅलेंटाईनबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर त्याने आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. या व्हिडीओचा चाहते आपल्या पद्धतीने वेगवेगळा अर्थ लावत आहेत.

व्हॅलेंटाईन डे पूर्वी शिखर धवनला आली पत्नीची आठवण! Video तून सांगितली मोठी गोष्ट
घटस्फोटानंतर शिखर धवननं इंस्टाग्रामवर शेअर केला Video, म्हणाला, "जीवनात..."
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: व्हॅलेंटाईन डे आता जवळ आला प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण तरुणी तयारीत आहेत. असं असताना व्हॅलेंटाईन डे पूर्वी क्रिकेटपटू शिखर धवनची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. शिखर धवननं इन्स्टाग्रामवर आपलं मनं मोकळं केलं आहे.शिखर धवन सोशल मीडियावर सक्रीय असतो. रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकत असतो. मात्र या वेळचा रिल काहीतरी वेगळंच सांगूत जात आहे. असं असलं तरी त्याने हा रिल मनोरंजनाच्या दृष्टीने तयार केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तर काही चाहते या रिलचा संबंध एक्स वाईफ आयशा मुखर्जीशी जोडत आहेत.शिखरने 2012 मध्ये आयशा मुखर्जीशी लग्न केलं होतं. शिखर आणि आयशा 2021 मध्ये विभक्त झाले आहेत. आयशा मुखर्जीनं स्वत:याबाबत सोशल मीडियावर खुलासा करत ही माहिती दिली होती.

व्हॅलेंटाईन डे पूर्वीच शिखरने व्यक्त केल्या भावना

शिखर धवनला इन्स्टाग्रामवर विचारलं गेलं की, व्हॅलेंटाईन डेला काय प्लान आहे? तेव्हा शिखर धवननं आपल्या अंदाजात उत्तर दिलं.शिखर धवनने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हंटलं आहे की, “जेव्हा जीवनात नाही परी, तर काय करायची 14 फेब्रुवारी..” या रिल्सवर चाहते मजेशीर कमेंट्स देत आहेत.

शिखर धवनची क्रिकेट कारकिर्द

सध्या शिखर धवन भारतीय संघात नाही. मात्र आयपीएलमध्ये त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएल 2023 मध्ये शिखर धवन पंजाब किंग्ससाठी कर्णधारपद भूषविताना दिसणार आहे. शिखर धवनने आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय, 68 टी 20, 122 फर्स्ट क्लास, 302 लिस्ट ए आणि 318 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत शिखर धवननं 7 शतकं आणि 5 अर्धशतकांच्या जोरावर 2315 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात 17 शतकं आणि 39 अर्धशतकांच्या जोरावर 6793 धावा केल्या आहेत. आंतराष्ट्रीय टी 20 सामन्यात 11 अर्धशतकांच्या जोरावर 1759 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये 2 शतकं आणि 66 अर्धशतकांच्या जोरावर 9272 धावा केल्या आहेत.