लंडन : आयसीसी विश्वचषक 2019 चा अंतिम सामना अतिशय रंजक झाला. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना दोनदा टाय झाला. सामना टाय होवूनही आयसीसीच्या नियमांनुसार इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. या सामन्यात दोन्ही संघांनी दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडचा हा सामना पाहाण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते लॉर्ड्सच्या मैदानावर उपस्थित होते. यापैकीच एक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते.
मिलिंद नार्वेकर हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकातील फायनल सामना पाहाण्यासाठी मिलिंद नार्वेकरांनी थेट इंग्लंड गाठलं. नार्वेकरांनी कुटुंबासह या सामन्याची मजा लुटली.
पाहा फोटो
संबंधित बातम्या :
एकाकी झुंजला, वाघासारखं लढला, न्यूझीलंडमध्ये जन्मलेला बेन स्टोक्सने इंग्लंडला जिंकवलं!
धोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे’